शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस हजार लोकसंख्येपुढील गावांसाठी ‘ग्रामोत्थान’ योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:44 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक मोठी गावे आहेत. परंतु या सर्व गावांना अन्य ग्रामपंचायतींसारखेच निकष असल्याने त्यांना निधीही तुलनेत मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. जरी पंधराव्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असला तरी तो पुरेसा होत नाही.

समीर देशपांडेकोल्हापूर राज्यातील २५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांसाठी नगरोत्थान योजनेप्रमाणेच ‘ग्रामोत्थान’ योजना राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने केला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, त्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याबाबत सोमवारी ऑनलाइन बैठकही पार पडली.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक मोठी गावे आहेत. परंतु या सर्व गावांना अन्य ग्रामपंचायतींसारखेच निकष असल्याने त्यांना निधीही तुलनेत मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. जरी पंधराव्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असला तरी तो पुरेसा होत नाही. अशा मोठ्या गावांचे प्रश्नही तितकेच मोठे असतात. हे गाव शक्यतो शहराजवळील असते किंवा तालुक्यातील एखाद्या विभागातील मोठे गाव असते. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढती राहाते. त्यामुळे रस्ते, गटर्सपासून ते अन्य मूलभूत सोयीसुविधांसाठी मोठ्या निधीची गरज भासते.

यावर उपाय म्हणून मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान करून देण्याबाबतच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेप्रमाणे राज्यातील २५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामोत्थान योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.हा प्रस्ताव तयार करताना योजनेचे निकष, योजनेत समाविष्ट करावयाचे घटक इ. शिफारशी सुचवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद हे या समितीचे सदस्य असून, पुण्याच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव आहेत.

पायाभूत सुविधा निवडीसाठी उपसमिती

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संयोजनाखाली पायाभूत सुविधा निवड उपसमिती नेमण्यात आली आहे. यामध्ये विजय मुळीक, अजिंक्य पवार, महेश आवताडे, कमलाकर रणदिवे, अरुण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, भूषण जोशी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीची ऑनलाइन बैठक सोमवारी झाली असून, यामध्ये विविध बाबींचा ऊहापोह करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत