शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा रद्द, केवळ ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:06 IST

कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजवरच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन गावगाड्यात ग्रामसभांच्या गदारोळाविना शांत शांत जाणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा रद्द, केवळ ध्वजारोहणग्रामविकासचे सुधारित आदेश : गावगाडा प्रथमच शांत

कोल्हापूर : कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजवरच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन गावगाड्यात ग्रामसभांच्या गदारोळाविना शांत शांत जाणार आहे.ध्वजारोहण झाले की ग्रामसभाचा आखाडा गरजण्यास सुरुवात व्हायची. दरवर्षी गावागावांत दिसणारा माहौल यावर्षी अजिबात दिसणार नाही. ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून सहा वेळा ग्रामसभा बोलावता येतात. या सभेत सुसंवादापेक्षा वादच जास्त झडू लागल्याने ही संख्या तीन वर आणण्यात आली.

जास्तीच्या सभा बोलावता येतात; पण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या तीन वेळेला सक्तीने ग्रामसभा घ्याव्याच लागतात. ग्रामसभा हीच आमसभा असल्याने तिला गावपातळीवर सर्वाधिकार असतात. यावर्षी तर १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्चासह येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगातील निधीतून संभाव्य कामांचा कृती आराखडा तयार केला जाणार होता; पण कोरोनाने या सर्व नियोजनावर पाणी फिरवले आहे.ध्वजारोहणासाठी मार्गदर्शक सूचनामुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाल्यामुळे तेथे ध्वजारोहण कुणी करायचे याच्या मार्गदर्शक सूचना ग्रामविकासने जारी केल्या आहेत. त्यानुसार पहिला मान स्वातंत्र्यसैनिक यांना देण्यात आला आहे. ते नसतील तर तंटामुक्त अध्यक्षाला मान दिला जाणार आहे. तेही नसतील तर ग्रामसेवकाने ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडावयाची आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनkolhapurकोल्हापूर