शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:10 IST

प्रत्येकजण विकासाची भाषा करत मतदारांना करतायत विनवण्या

राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रत्येकजण विकासाची भाषा करत मतदारांना विनवण्या करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांच्या अजेंड्यावर विकासाचा वचननामा आहे, सर्वजण विकासाची हमी देतात, मग इतकी वर्षे गाव भकास कसे राहिले? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होत आहे. त्यामुळे हळूहळू गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे. व्यक्तिगत उमेदवारांसह पॅनल प्रमुखांकडून गावाच्या विकासाचे राेल मॉडेल मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. रस्ते, गटर्ससह व्यक्तिगत लाभाच्या योजना आपणच कसे तुमच्यापर्यंत पोहचवू शकतो, हे ठासून सांगितले जात आहे. सत्ताधारी मंडळी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती पुस्तिका मतदारांसमोर ठेवत आहेत. त्याचबरोबर पुन्हा संधी द्या, उर्वरित कामे पूर्ण करण्याचे अभिवचन दिले जात आहे. तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बोट ठेवत आम्हाला सत्तेची संधी द्या, गाव विकासाचे मॉडेल बनवू, असा विश्वास देत आहेत. गावाच्या विकासाची आश्वासने दोन्ही बाजूने दिली जात असतानाच मतदार मात्र द्विधा मनस्थितीत दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात किती विकास केला हे मतदार जाणून आहेत, हीच मंडळी पुन्हा संधी देण्याचे आवाहन करत आहेत. जे आता विराेधक आहेत, तेही कधीतरी सत्तेत होते. दोन्ही पॅनलकडे विकासाची इतकी दृष्टी आहे तर मग गाव भकास कसे झाले?, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.निवडणुकीतील प्रचारापुरता वचननामा राहतो, सत्ता मिळाली की वचननामा कागदावरच राहतो, हा अनुभव बहुतांशी गावातील मतदारांचा आहे.

आणाभाका, जेवणावळी सुरूमतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे वातावरण तापू लागले आहे. गल्लीतील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सर्रास आणाभाका सुरु आहेत. जेवणावळींनी ढाबे फुलू लागले आहेत. एकत्र जेवणावळ करण्यापेक्षा प्रत्येकाला हॉटेलची कूपन दिली जात आहेत.

परगावच्या मतदारांना वाहतुकीची सोयपरगावच्या मतदारांची प्रत्येक उमेदवाराची यादी तयार आहे. त्यांच्याशी संपर्क साधला जात असून मतदान दिवशी त्यांना येण्यासाठी वाहतुकीची सोयही करुन दिली जात आहे.

कटआऊट झळकले....उमेदवारांचे नाव, चिन्हासह विकासाच्या अभिवचनाचे कटआऊट गावोगावी झळकले आहेत. त्याचबरोबर घरोघरी प्रचार पत्रिका पोहच झाल्या आहेत. मतदारराजा अगदी शांतपणे त्याचे निरीक्षण करुन आपलं मत निश्चित करताना दिसत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक