शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

रेशनवरील हरभरा आणि उडीद डाळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 14:27 IST

रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल.

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल. जिल्ह्यासाठी दोन्ही मिळून ११०० टन डाळींची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त सरकारने रेशनवर प्रतिकिलो ३५ दराने हरभराडाळ व ४४ रुपयांनी उडीदडाळ देण्याची घोषणा केली होती; परंतु हे दर सर्वसामान्यांना परवडणार नसल्याने दुकानदारांनी ती न उचलण्याचा पवित्रा घेतला होता; परंतु सरकारने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही डाळ उपलब्ध करून दिली नाही.

त्यामुळे या डाळीविनाच ग्राहकांना दिवाळी साजरी करावी लागली. त्यानंतर ही डाळ रेशनवर यायला सुरुवात झाली; परंतु ती पुरेशा प्रमाणात नसल्याने दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातच आता शासनाने या डाळींचे दर वाढविले असून, हरभराडाळीचा दर ४० रुपये व उडीदडाळीचा दर ५५ रुपये केला आहे. या वाढीव दराने पुढील महिन्यापासून विक्री करण्यात येणार आहे.

खुल्या बाजारात हरभरा डाळीचा दर प्रतिकिलो जवळपास ८० रुपये व उडीद डाळीचा दर ९० रुपयांच्या आसपास आहे. या दराने डाळ घेणे सर्वसामान्य ग्राहकांना एक दिव्यच होऊन बसले आहे. त्यातच रेशनवर डाळ उपलब्ध करून दिल्याने थोडासा दिलासा मिळाला होता; परंतु त्याचे दर वाढल्याने ग्राहकांना झळ बसणार असल्याने त्यांच्या रोषाला रेशन दुकानदारांसह पुरवठा विभागालाही येणाऱ्या काळात सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार डाळजिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे हरभराडाळ ५५० टन व उडीदडाळ ५५० टन असे ११०० टन डाळींची मागणी केली आहे. मागणीप्रमाणे डाळ शासकीय गोदामांमध्ये यायला सुरुवातही झाली आहे. महिनाअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने ती येणार आहे. अंत्योदय ५१ हजार व प्राधान्य ४ लाख ९९ हजार रेशन कार्डधारक कुटुंबांना एक किलोप्रमाणे ही डाळ दिली जाईल. 

रेशनवरील हरभरा व उडीदडाळींचा दर वाढला असला तरी तो खुल्या बाजारातील डाळींपेक्षा कमी आहे. तसेच रेशनवरील डाळ ही उत्तम प्रतीची व दर्जेदार असून ती एक किलोच्या पॅकेटमध्ये सीलबंद केलेली आहे. शासकीय गोदामात डाळ यायला सुरुवात झाली असून, पुढील महिन्यापासून वाढीव दराने तिची विक्री होईल.- अमित माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

हरभराडाळ व उडीदडाळ सध्या रेशनवर पूर्ण क्षमतेने येत नाहीत; त्यामुळे ग्राहकांचा दुकानदारांवर रोष आहे. त्यातच सरकारने डाळींचे दर वाढवून या रोषात भर पाडली आहे. यामुळे दुकानदारांची अडचण झाली असून, त्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. ही वाढ निषेधार्ह आहे. ती त्वरित मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती