शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जुन्या पेन्शनसाठी येत्या मंगळवारपासून सरकारी काम, शाळा बंद; राज्यातील ऐंशी हजार कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 12:51 IST

संपात कोल्हापुरातील ८० हजार कर्मचारी व शिक्षक सहभागी

कोल्हापूर : राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (दि. १४) बेमुदत संपावर जाणार आहेत. संपात कोल्हापुरातील ८० हजार कर्मचारी व शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, दादा लाड व भरत रसाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. संपामुळे सरकारी कार्यालये आणि शाळांमधील शिक्षण व्यवस्था ठप्प होणार असून, नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत.संपाच्या पहिल्यादिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी २ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल असा रॅलीचा मार्ग असेल. त्यामुळे मंगळवारपासून सरकारी कार्यालये तर उघडतील, पण कर्मचारी नसल्याने कामकाज होणार नाही. शाळेत विद्यार्थी येतील, पण शिक्षक व अन्य कर्मचारी असणार नाहीत, अशी स्थिती होणार आहे.जुनी पेन्शनसह कंत्राटी, अंशकालीन, राेजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे भरा, अनुकंपावरील नियुक्त्या बिनशर्त करा, चतुर्थश्रेणी व वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, खासगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करा, अशा विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असा निर्णय राज्य समन्वय समितीच्या बैठकीत झाला आहे.

बेमुदत संपाची नोटीस देऊनही आणि कोल्हापुरात ४ मार्चला निघालेल्या मोर्चानंतरदेखील राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या पेन्शनवर भाष्य केले गेले नाही, हे निषेधार्ह असून, आता बेमुदत संप अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. परिषदेला वसंत डावरे, संजय क्षीरसागर, नितीन कांबळे, अंकुश रानमाळे, योगेश यादव, रमेश भोसले यांच्यासह कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतन