शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे हत्या सुनावणी : अंदुरे, कुरणेंचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 18:43 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद मांडण्यात आला.

ठळक मुद्देगोविंद पानसरे हत्या सुनावणी : अंदुरे, कुरणेंचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणीविशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडला युक्तिवाद : पुढील सुनावणी शुक्रवारी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद मांडण्यात आला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सुनावणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सुनावणीत सहभागी झाले. तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे हेही उपस्थित होते.दि. १० ऑगस्टला झालेल्या सुनावणीत संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी, पानसरे हत्याप्रकरणात संशयितांचा कोणत्याही प्रकरणात संबंध दिसून न आल्याने जामीन मंजूर करावा, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली होती. त्यावर सोमवारी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी संशयितांचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. त्यांनी मांडलेल्या युक्तिवादात, संशयित अंदुरे आणि कुरणे यांचा ॲड. पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यात अप्रत्यक्ष संबंध दिसून येतो.

त्यामुळे जामीन मिळाल्यानंतर संशयित हे साक्षीदारांवर दवाब आणू शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी न्यायालयात केली. दोन तासांहून अधिक काळ ही सुनावणी सुरू होती. पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे.ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यातील संशयित सारंग आकोळकर, विनय पवार या दोघांचाही अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान, संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांनीही जामीन मिळावा, यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर ही सुनावणी झाली.खटल्यातील अल्पवयीन साक्षीदारास धमकाविणे, हत्येसाठी वापरलेली दुचाकी कोल्हापुरात आणणे, हत्येच्या कटात अप्रत्यक्ष सहभागी होणेअशा अनेक प्रकरणांत दोघांचा संबंध दिसून येत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे दोघांही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी केली असल्याचे ॲड. शिवाजीराव राणे यांनी सांगितले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनीही पुण्याहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी मध्ये सहभागी होऊन बाजू मांडल्याचेही ॲड. राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर