शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पानसरे हत्या प्रकरण: सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला

By उद्धव गोडसे | Updated: February 7, 2023 16:46 IST

सुनावणीत नेमकं काय झाले, पुढील सुनावणी कधी जाणून घ्या

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षामार्फत सादर झालेल्या पुराव्यांपैकी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज न्यायाधीश एस. एस. तांबे (३) यांनी फेटाळला.तसेच संशयित समीर गायकवाड याच्या वैद्यकीय उपचाराच्या अर्जाबद्दल एसआयटीच्या पोलिसांनी प्रत्यक्ष सांगलीत जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश न्यायाधीश तांबे यांनी मंगळवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत दिले. पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीस होणार आहे.कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात १० संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले असून, सरकार पक्षातर्फे ४३ पुरावे आणि पंचनाम्यांची यादी सादर करण्यात आली आहे. त्यापैकी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मिळावी, असा मागणी अर्ज संशयितांच्या वकिलांनी केला होता.मात्र, संबंधित फुटेज अस्पष्ट असल्याचे गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबने स्पष्ट केले आहे. सरकार पक्षामार्फत हा पुरावा कोर्टात मांडला जाणार नाही. त्यामुळे त्याची प्रत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायाधीश तांबे यांनी संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला.मंगळवारच्या सुनावणीत संशयितांच्या वकिलांना पुरावे आणि पंचनाम्यांच्या यादीवर म्हणणे सादर करायचे होते. मात्र, घनास्थळावरील फुटेजच्या पुराव्याची प्रत मिळाली नसल्याने त्यांना म्हणणे सादर केले नाही. पुढील सुनावणीत त्यांना यावर म्हणणे सादर करावे लागणार आहे. सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली, तर संशयितांच्या वतीने ॲड. प्रीती पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी एसआयटीच्या अधिका-यांसह मेघा पानसरे, दिलीप पवार न्यायालयात उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय