शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Kolhapur: पानसरे खून खटल्यातील संशयितास पंच साक्षीदाराने व्हीसीवरून ओळखले, उद्या पुन्हा सुनावणी

By उद्धव गोडसे | Updated: January 24, 2024 17:11 IST

गोळीबार सराव ठिकाण पाहणीतील पंच साक्षीदाराची साक्ष

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात बुधवारी (दि. २४) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर पंच साक्षीदाराने संशयित आरोपी वासुदेव भगवान सूर्यवंशी (रा. साखळी, ता. यावल, जि. जळगाव) याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ओळखले. सूर्यवंशी याच्यासह तिघांनी साखळी येथील शेतात पिस्तूलातून गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. त्या ठिकाणासाह सूर्यवंशी याचे घर आणि गॅरेजच्या पंचनाम्यातील पंच साक्षीदाराचा सरतपास आणि उलट तपास बुधवारी पूर्ण झाला. उद्या गुरुवारी (दि. २५) पुन्हा सुनावणी होणार आहे.संशयित आरोपी वासुदेव सूर्यवंशी, सचिन अंदुरे आणि किरण पाटील या तिघांनी साखळी (जि. ज‌ळगाव) येथील शेतात २०१४ मध्ये पिस्तुलातून गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. त्यांच्या अटकेनंतर चौकशीत हा प्रकार समोर आला. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी १२ डिसेंबर २०१८ मध्ये सूर्यवंशी याला सोबत घेऊन गोळीबार सरावाचे ठिकाण, त्याचे घर आणि गॅरेजची झडती घेऊन पंचनामा केला. त्यावेळच्या पंच साक्षीदाराची साक्ष बुधवारी न्यायालयात नोंदवण्यात आली. तपास अधिका-यांच्या सांगण्यावरून पोलिसांसमोर साखळी येथील गोळीबार सरावाचे ठिकाण, संशयित सूर्यवंशी याचे घर आणि त्याच्या गॅरेजची पाहणी करण्यात आली. संशयित आरोपी सूर्यवंशी हाच रस्ता दाखवत घटनास्थळी घेऊन गेला होता, अशी माहिती साक्षीदाराने दिली. तसेच बेंगळुरू कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित असलेला संशयित सूर्यवंशी याला साक्षीदाराने ओळखले. त्याचे घर आणि गॅरेजच्या झडतीत काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नाहीत, असेही त्यांनी न्यायाधीसांसमोर सांगितले. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सरतपास घेतला. संशयित आरोपी समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह चौघे न्यायालयात हजर होते, तर अन्य सहा संशयितांनी बेंगळुरू कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय