शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या, उलट तपासणीत प्रश्नांची सरबत्ती 

By सचिन भोसले | Updated: September 8, 2023 19:28 IST

दोन वेळा वकिलांत शाब्दीक वाद

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात शुक्रवारी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात पहिला संशयित आरोपी समीर गायकवाडच्या घरी जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या. यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती करीत संशयित आरोपीच्या वकीलांनी पंच साक्षीदारांचा उलट तपास घेतला. पुढील सुनावणी नऊ ऑक्टोंबरला आहे.पुणे येथील येरवडा तुरुंगातील व सध्या जामीनावर असलेला समीर गायकवाड गुरुवारी खटल्यात प्रत्यक्ष हजर होता. तर बंगळूरातील संशयित आरोपी व्हीसीद्वारे सहभागी झाले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी गुरुवारी (दि.७) सर तपास घेतला होता. त्याचा पुढील भाग म्हणून उलट तपास संशयित आरोपीच्या वकीलांनी घेतला. सकाळच्या सत्रात झालेल्या सुनावणीत संशयित आरोपीचे वकील अनिल रुईकर यांनी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनातील पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड च्या घरी जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या? पुस्तकावर छापील किंमती असताना त्याचा पंचनाम्यात उल्लेख का केला नाही. घरात जप्त केलेल्या वस्तू पुन्हा कोल्हापूरातील अपर पोलिस अधीक्षकांच्या येथे दुसऱ्या पाकिटात घालण्यात आल्या. यावेळी जुनी पाकिटे कोठे आहेत? जप्त केलेल्या ६८ वस्तूंपैकी एक आणि दोन क्रमांकाच्या पाकीटात किती मोबाईल होते असे विचारले असता पंच साक्षीदाराने उत्तर दिले. ॲड. रुईकर यांनी प्रश्न विचारला असताना ॲड. निंबाळकर यांनी हस्तक्षेप नोंदविला. दोन वेळा वकिलांत शाब्दीक वाद झाला. अखेर न्यायालयाने स्वत: पंचनामा वाचून कामकाज सुरु ठेवले. संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी पंच साक्षीदार हे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांचे मित्र असल्यानेच त्यांनाच पंच साक्षीदार म्हणून बोलाविले असा प्रश्न केला.

तपासात पोलिसांना अनेकांचे फोन, नावे घेतली होती. त्यातील मी एक होताे, मी मित्र नाही असे पंच साक्षीदाराने सांगितले. पोलिस अधीक्षकांकडे सर्व पंचनामा तयार होता यावर पंच साक्षीदारांनी केवळ सह्या केल्या. पोलिसांनी फिर्यादीला मदत करण्यासाठी हे केले आहे असा आक्षेप नोंदवला. यावर पंच साक्षीदाराने हे चुकीचे आहे असे उत्तर दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय