शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे खून खटला: मेमरी कार्ड अन् संभाषण संहितेत विसंगती, पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:31 IST

काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या मोबाइलमधील संभाषण आणि पोलिसांनी त्यावरून तयार केलेल्या संहितेत विसंगती असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी मंगळवारी पंच साक्षीदाराच्या उलट तपासणीत केला. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला होणार आहे.पानसरे खून प्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना गुन्ह्याशी संबंधित असलेले संभाषण मिळाले होते. त्या संभाषणाचे मेमरी कार्ड जप्त करून पोलिसांनी त्यावरून संभाषणाची संहिता तयार केली. त्यावेळच्या पंच साक्षीदाराचा सरतपास झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांना मंगळवारी उलट तपास घेतला. मेमरी कार्डमधील संभाषण आणि पोलिसांनी तयार केलेल्या संहितेत विसंगती असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाचे वकील अनिल रुईकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि समीर पटवर्धन यांनी केला.यावेळी काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. मात्र, विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी वेळोवेळी त्यावर आक्षेप घेऊन पंच साक्षीदारावर दबाव टाकू नये, अशी विनंती केली. सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपी पोलिस बंदोबस्तात उपस्थित होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय