शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद निहलानीं, अभिजीत देशपांडे यांना किफ्फतर्फे पेंटर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:47 IST

सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यंदा ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षि आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कलामहर्षि बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.

ठळक मुद्देगोविंद निहलानीं, अभिजीत देशपांडे यांना किफ्फतर्फे पेंटर पुरस्कार किफ्फचे उदघाटन रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते : चंद्रकांत जोशी

कोल्हापूर : सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यंदा ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षि आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कलामहर्षि बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.लक्ष्मीपुरीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे गुरूवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. यावेळी छायालेखक गोविंद निहलानी यांना तर महोत्सवाच्या सांगता समारंभात (दि. १४) सायंकाळी सहा वाजता संकलक अभिजीत देशपांडे यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल.गोविंद निहलानी यांनी विजय तेंडूलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकापासून स्वयंत्र छायाचित्रण व निर्मितीची सुरुवात केली. जुनून या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार तर अर्धसत्य या चित्रपटाला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तमस मालिका, पार्टी, आघात, सुवर्ण मयुरा, द्रोहकाल अलिकडेच प्रदर्शित झालेला ती आणि इतर हे त्यांचे प्रमुख चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना सहा वेळा राष्ट्रीय, पाच फिल्मफेअर पुरस्कार तसेच पद्मश्री ने गौरवण्यात आले आहे.अभिजीत देशपांडे यांनी वर्तमान या मालिकेपासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली. देऊळ या चित्रपटासाठी त्यांना मिफ्टा पुरस्कार, पुणे ५२ चित्रपटासाठी दादासाहेब फाळके अ‍ॅकॅडमी अवॉर्ड मिळाला. त्यांनी गंध, समांतर, एलिझाबेथ एकादशी, न्यूड, बकेट लिस्ट या चित्रपटांचे संकलन केले. आहे. या शिवाय विविध मालिकांसाठी ते काम करत आहेत.महोत्सवांतर्गत रसिकांना देशविदेशातील चित्रपटांचा आस्वाद तसेच मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षक सभासद नोंदणी गायन समाज देवल क्लब खासबाग येथे दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत सुरू आहे. तसेच आयनॉक्स येथे गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून नोंदणीस सुरूवात होईल. तरी रसिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Govind nihlaniगोविंद निहलानी kolhapurकोल्हापूर