सांगरूळ : शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गोकूळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केले.
सांगरूळ (ता.करवीर) येथील जि.प. मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर पत्र वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदीप पाटील होते.
यावेळी बाळासाहेब खाडे म्हणाले सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आमदार पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असून मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प आपण केला असून येत्या काळात तो पूर्ण करून देण्याच्या जबाबदारीनेच आपण काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी संदीप पाटील यांनी आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तीन महिन्यात ९०० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगत येत्या काळात प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे गोकूळचे संचालक सत्यजित पाटील, शिवाजी देसाई, विश्वास निगडे, आनंदा नाळे, भरत खाडे, रंगराव कोळी, सरदार पाटील, उत्तम कासोटे, रवी खाडे, मच्छिंद्र मडके, विष्णूपंत खाडे, एन.डी. खाडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.