शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात मुश्कील : गोविंद निहलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:07 IST

दिग्दर्शकाला त्याला हव्या असणाऱ्या विषयावर चित्रपट काढला, तर त्याला सेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात तरी मुश्कील आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देसेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात मुश्कील : गोविंद निहलानी गोविंद निहलानी यांच्याशी मुक्तसंवाद

कोल्हापूर : दिग्दर्शकाला त्याला हव्या असणाऱ्या विषयावर चित्रपट काढला, तर त्याला सेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात तरी मुश्कील आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याशी सुरू असलेल्या सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी मुक्तसंवाद साधला. यावेळी फिल्म फेडरेशनचे सुधीर नांदगावकर आणि ‘किफ’चे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते. गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला ‘तू आणि इतर’ हा मराठी चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आला. यावेळी नांदगावकर यांच्या सिनेमा संस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन निहलानी यांनी केले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुक्त संवाद साधताना ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी. (छाया : नसीर अत्तार)

गोविंद निहलानी यांनी त्यांचा पहिला चित्रपट शांतता कोर्ट चालू आहे, मराठीत दिग्दर्शीत केला. तसेच विजय तेंडुलकर, अमोल पालेकर, लेखक पानवलकर या मराठी लेखक, कलाकारांसोबत काम केले, असे सांगून आक्रोश, अर्धसत्य आणि आताचा ‘तू आणि इतर’ या सर्व चित्रपटांशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ हे मराठी आहेत, याचा आवर्जून उल्लेख निहलानी यांनी केला.

हिंदी, बंगालीत सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांनी चाकोरीबाहेरचा चित्रपट काढला आणि ‘शांतता कोर्ट चालू आहे’च्या निमित्ताने तो प्रयोग मराठीत प्रथम करून या नवीन प्रवाहाला तरुण पिढीने प्रतिसाद दिला. आताही ‘तू आणि इतर’ या सिनेमाच्या निमित्ताने कुटुंबावर ओढवलेली समस्या त्याने स्वत:च सोडवायची असते, असा संदेश देणारा वेगळा चित्रपट काढला आहे.तुम्हाला तो प्रश्न भिडला, हेच या सिनेमाचे यश आहे, असे ते म्हणाले. ‘तमस’सारख्या दूरदर्शनवरील मालिकेसाठी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांनीच सहकार्य केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रकरण न्यायालयात गेले; पण कायदा आणि संविधान जोपर्यंत पाठीशी आहे, तोपर्यंत तुम्हाला भिडलेला विषय मांडण्याचे धाडस दाखवायला हवे, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.‘तमस’सारखा सशक्त विषय आणि निर्मात्याचे पाठबळ मिळाल्यास तसा विषय पुन्हा हाताळणे शक्य आहे. आज केवळ चित्रपट नाही, तर वेबसिरीजसोबत अनेक दारे नव्या पिढीसमोर खुली आहेत, असेही ते म्हणाले. ‘गांधी’सारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट परदेशी कलाकार, तंत्रज्ञांसोबत करण्यामध्ये समाधान मिळाले. त्यांची शिस्तबद्धता आणि कामाची पद्धत अनेक अनुभव देऊन गेली, असे ते म्हणाले. नवी पिढी हुशार आहे आणि चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमुळे चित्रपट संस्कृती बहरत आहे, असेही ते म्हणाले.चित्रपटातून समस्येवर उत्तर देणे बंधनकारक नाहीबहुतेक चित्रपटातून मांडलेल्या समस्यांवर उत्तरही दिले गेले असते; परंतु ते बंधनकारक नाही. प्रेक्षकांना विचारास प्रवृत्त करणे हा एक मोठा बदल या माध्यमातून करता येऊ शकतो. ‘तू’ आणि इतर चित्रपटांत सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात आलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकला आहे; मात्र त्याचे उत्तर प्रेक्षकांवरच सोपवलेले आहे. प्रश्न उपस्थित करणे ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचे उत्तर काय असेल, असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण होण्यातच या चित्रपटाचे यश आहे, असे गोविंद निहलानी म्हणाले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसरे का देतील, असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने केला. 

टॅग्स :Govind nihlaniगोविंद निहलानी kolhapurकोल्हापूर