शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकूण २० तक्रारी दाखल : भोंदूबाबासह गोशाळेची बँक खाती गोठवली-आठ सेवेकऱ्यांचीही होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:29 IST

कोल्हापूर : स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात असे भासवून भक्तांकडून फ्लॅट, मठ, राधानगरी येथील गोशाळेसाठी ३५ लाख रुपये घेऊन ...

ठळक मुद्दे सेवेकरी अष्टेकर संस्थेवर विश्वस्त;

कोल्हापूर : स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात असे भासवून भक्तांकडून फ्लॅट, मठ, राधानगरी येथील गोशाळेसाठी ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस (रा. सिद्धाळा गार्डनमागे, मंगळवार पेठ) याची तसेच गोशाळेच्या नावावर असणारी एकूण चार बँकेतील खाती शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी गोठवली. शिवाय त्यांच्यासोबत अटक केलेली सेवेकरी सविता अनिल अष्टेकर(वय ३५, रा. मंगळवार पेठ) ही महिला गोशाळेच्या संस्थेमध्ये विश्वस्त असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आपल्या मुखातून स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबा प्रवीण फडणीस याने भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह सविता अष्टेकर व श्रीधर नारायण सहस्रबुध्दे (५५, रा. फुलेवाडी चौथा बसस्टॉप) या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी तक्रारीवरून शुक्रवारी अटक केली होती. त्यावेळी त्याने भक्तांची विविध माध्यमातून सुमारे ३ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे संबंधित तिघांविरुध्द संदीप प्रकाश नंदगावकार यांच्यासह १२ जणांनी केलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी आणखी ८ जणांनी तक्रारी दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या २० वर पोहोचली आहे.नंदगावकर यांच्यासह सेवेकरीकडून घेतलेल्या पैशातून भोंदूबाबा फडणीस याने मंगळवार पेठेतील मठासह, दोन फ्लॅट व कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे गोशाळेच्या इमारतीवर खर्च केल्याचे दिसून आले आहे. गोशाळेच्या इमारतीवर सुमारे ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याप्रकरणी भोंदूबाबा फडणीस व गोशाळा संस्थेची विविध चार बँकेत असणारी खाती गोठवण्याचे पत्र देण्यात आले आहे. याशिवाय या मालमत्तेबाबत कोणतेही व्यवहार करण्यात येऊ नयेत. यासाठी उपनिबंधक, महसूल विभाग यांना लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. दरम्यान, अटकेतील सेवेकरी सविता अष्टेकर या गोशाळा संस्थेच्या विश्वस्तपदी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मंगळवार पेठेतील मठाच्या खोल्यामध्ये सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मठाच्या तपासणीवेळी तलवार सापडली, त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीर हत्यार बाळगल्याचाही गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, कसबा तारळेतील गोशाळा संस्थेमध्ये काही सेवेकरी मोफत सेवा करत असले तरी तेथील गोमूत्र साठवण करून त्याचा गो अर्क काढून विकणारी संस्थाही त्यांनी नोंदणीकृत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.एम.टेक्‌. झालेला विद्यार्थीही सेवेतया मठात एम.टेक्‌. शिक्षण झालेला एक विद्यार्थी सेवेकरी असल्याचे आढळले आहे. त्याचे आई-वडील त्याला नेण्यासाठी आले पण त्याने मठातून घरी जाणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीसही अवाक्‌ झाले. शिवाय मठात व कसबा तारळेतील गोशाळेत असणाऱ्या एकूण ८ सेवेकऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाbankबँक