शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 4:48 PM

Politics Chandgad Kolhapur- चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला राजीनामा देणार असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) किंवा जिल्हा बँकेतील सत्तेचा वाटा त्यांना खुणावत असल्याने अगोदरच फज्जा शिवलेला बरा म्हणून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील व गोपाळराव हे जुने गट त्यानिमित्ताने एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानण्यात येते.

ठळक मुद्देगोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार चंदगडचे राजकारण : गोकुळ, जिल्हा बँकेतील खुणावते सत्ता

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला राजीनामा देणार असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) किंवा जिल्हा बँकेतील सत्तेचा वाटा त्यांना खुणावत असल्याने अगोदरच फज्जा शिवलेला बरा म्हणून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील व गोपाळराव हे जुने गट त्यानिमित्ताने एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानण्यात येते.चंदगड तालुक्याच्या राजकारणात एकेकाळी गोपाळराव पाटील यांचा प्रबळ गट होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दोनवेळा धडक दिली. परंतु, यश मिळाले नाही. आजही त्यांच्याकडे किमान २५ हजार मतांचा गट आहे. सामान्य कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल ओढ आहे. परंतु, हातात कोणतीच सत्ता नसल्याने त्यांची राजकारणात पीछेहाट आणि कोंडीही झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. हा मतदारसंघ युतीच्या वाटणीत शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे भाजपला उमगले नाही. त्यामुळे या सर्वांना अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची पाळी आली.

पुढे राज्याच्या सत्तेतूनही भाजप हद्दपार झाला. राज्यातील सरकारमध्ये काही गडबड होईल, अशीही स्थिती नाही. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे भाजपसोबत विरोधात राहण्याची गोपाळराव यांची मानसिकता नाही. त्यामुळेच भाजपला रामराम करून काँग्रेसचा झेंडा ते पुन्हा हातात घेतील, असे चित्र दिसते.पालकमंत्री सतेज पाटील हेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना पक्षाचे संघटन बळकट करायचे आहे. काँग्रेसमध्ये सध्या ओमसाई आघाडीचे संभाजीराव देसाई हे काँग्रेसचे काम करत आहेत. गोपाळराव पाटील यांच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये आल्यास पक्षालाही आगामी निवडणुकीत चांगले यश मिळू शकते.

जिल्ह्यात गोकुळ व जिल्हा बँक ही महत्त्वाची सत्तास्थाने आहेत. आमदार राजेश पाटील व दीपक भरमू पाटील हे गोकुळचे संचालक आहेत. आमदार पाटील हे पालकमंत्री पाटील यांच्यासोबत राहतील, त्यामुळे गोकुळमध्ये संधी मिळाली नाही तरी गोपाळराव हे जिल्हा बँकेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड