शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅल्युअर्सना भविष्यात चांगले दिवस  : बी. कनगा सबापत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:19 IST

सध्याच्या बदलत्या युगात ‘व्हॅल्युएशन’ची गरज पदोपदी जाणवत असल्याने व्हॅल्युएशन विषयाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन व्हॅल्युएशन तज्ज्ञ बी. कनगा सबापत्ती यांनी केले.

ठळक मुद्देव्हॅल्युअर्सना भविष्यात चांगले दिवस : बी. कनगा सबापत्तीअसोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅड इंजिनिअर्सतर्फे चर्चासत्र

कोल्हापूर : सध्याच्या बदलत्या युगात ‘व्हॅल्युएशन’ची गरज पदोपदी जाणवत असल्याने व्हॅल्युएशन विषयाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन व्हॅल्युएशन तज्ज्ञ बी. कनगा सबापत्ती यांनी केले.असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅड इंजिनिअर्सच्या वतीने बुधवारी ‘पर्पज अ‍ॅँड मेथड्स आॅफ व्हॅल्युएशन’ या विषयावर ते बोलत होते. कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, सांगली, सातारा येथील आर्किटेक्टस व इंजिनिअर्स यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.बी. कनगा सबापत्ती म्हणाले, व्हॅल्युएशन ही काळाची गरज ठरत असल्याने भविष्यात व्हॅल्युअरना चांगले दिवस येतील. कोणत्या कामांसाठी व्हॅल्युएशन हवे आहे, यावरून कोणती सर्वोत्तम पद्धत अवलंबायची आणि कोणत्या प्रकारच्या किमतीचा निकष लावायचा हे निश्चित करावे लागते.

दैनंदिन व्यवहारात जरुरी असलेल्या व्हॅल्युएशनपैकी २४ प्रकारचे व्हॅल्युएशन फक्त बँकांमध्ये आवश्यक असते. इन्कम टॅक्स, लिलाव, वित्तीय संस्थांची कर्जप्रकरणे, व्हिसा, लिक्विडेशन, इन्शुरन्स या सर्वांचा विचार करता भविष्यात व्हॅल्युअर म्हणून काम करणाऱ्या आर्किटेक्टस व इंजिनिअर्स यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.प्रास्ताविकात असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस व इंजिनिअर्स या संस्थेच्या वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतला. राज डोंगळे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

यावेळी उमेश कुंभार, सुधीर राऊत, जयंत बेगामपुरे, प्रमोद पोवार, विजय पाटील, निशांत पाटील, उदय निचिते, संदीप घाटगे, महेश यादव, जीवन बोडके, अनिल निकम, बाजीराव भोसले, मोहन वायचळ, बलराम महाजन, आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सभासद प्रमोद चौगुले, गौरी चोरगे, प्रशांत काटे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर