शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे बेडे; एक न उलगडलेले कोडे!, कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये मृग नक्षत्राच्या पावसात सापडतात सोन्याची नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:41 IST

सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका आहे आणि त्या पावसाची प्रचिती सातत्याने होत असते

कसबा बीड : प्राचीन काळापासून करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव भोजराजाची राजधानी आणि लष्करी तळ म्हणून ओळखले जाते. येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका आहे आणि त्या पावसाची प्रचिती सातत्याने होत असते.

मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला की, या ठिकाणी शेतशिवारात, रस्त्याच्या बाजूला, घरांच्या छपरावर, शेणाच्या पू आदी ठिकाणी सुवर्ण मुद्रा, म्हणजे यादवकालीन सोन्याच्या नाण्यांची सापडणे नियमित झाले आहे. बीड या गावाच्या नावावरून या नाण्यांना 'सोन्याचे बेडे', असे संबोधले जाते. मात्र हे एक न उलघडणारे कोडे झाले आहे.या परिसरातून विरगळ, चांदीच्या आणि साध्या नाण्यांसह सोन्याचे नाग, पाषाणी मूर्ती, शिलालेख व प्राचीन मंदिरांचे अवशेषदेखील सापडतात. ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. मुख्यत्वे करून सन २०२० पासून कसबा बीडमधील ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व संशोधन करणाऱ्या "यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड" या संघटनेने या सुवर्ण मुद्रांविषयी माहिती संकलित आणि प्रसारित करणे सुरू केले आहे.कसबा बीड येथे सन २०२० पासून आजपर्यंत शेतशिवार व गाव परिसरात एकूण ३० ते ३२ प्राचीन मंदिरांचे ठिकाणे आणि अवशेष आढळले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपात लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणावर एकूण ३२ 'बेडे' सापडले आहेत. सरासरी वर्षाला ५ ते ६ असे नवीन प्रमाण सापडण्याचे दिसून येते. तसेच चांदीची नाणी ४, नेदरलँड्सच्या राणीची (इ.स. १८०० सालातील) एक साधी नाणी, पाषाणी विरगळ एकूण २१० आणि पाषाणी शिलालेख ३ आढळले आहेत. या सर्व घटना कसबा बीड गावाच्या वैभवात भर टाकतात, असे यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड संघटनेचे कार्यकर्ते सूरज तिबिले यांनी माहिती दिली आहे.

कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो, परंतु सापडणाऱ्या सुवर्ण मुद्रांचा एक न उलगडणारा कोडा आहे आणि इतिहास संशोधकांसाठी हा आव्हानात्मक विषय ठरला आहे. येथे सापडलेली बेडे गावस्थानींना दैवी देणगी व प्रसाद समजून घरातील देव्हाऱ्यात पूजा करतात. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती पंचायत समिती करवीर