शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळचा उद्या फैसला, राखीव गटातील निकाल पहिल्यांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:44 IST

GokulMilk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला उद्या , मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट होईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे. सर्वसाधारण गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील  निकाल पहिल्यांदा लागणार आहेत.

ठळक मुद्देसकाळी अकरापर्यंत कल समजणार पी. एन., महाडिक- सतेज, मुश्रीफह यांची प्रतिष्ठा पणास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला उद्या , मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट होईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे. सर्वसाधारण गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील  निकाल पहिल्यांदा लागणार आहेत.गेली दोन महिने गोकुळचे रणांगण आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. दूध उत्पादकांना दिलेली वेळेत दूध बिले, वर्षाला रिबेटच्या माध्यमातून दिलेले ९८ कोटींच्या जोरावर आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी रिंगणात उतरली होती तर मल्टिस्टेट, संघातील भ्रष्टाचार व सत्ता दिल्यास दोन रुपये जादा दर देण्याचे अभिवचन, हे मुद्दे घेऊन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने टक्कर दिली. 

दूध संघाशी संबंधित मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा झाली खरी मात्र पालकमंत्री पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील टीका-टिप्पणीमुळे निवडणुकीत रंगत आली होती. त्यामुळेच रविवारी दोन्ही आघाड्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकगठ्ठा मतदान करून घेतले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इर्षेने मतदान झाले. एकूण ३६४७ मतांपैकी ३६३९ मतदान झाले.मतदारसंघनिहाय मतमोजणी अंतर्गत सर्वसाधारण मतदारसंघ मतमोजणी १८ टेबलांवर होईल. या १८ टेबलांवर प्रत्येकी २५ मतांचे गठ्ठे दिले जातील. २५ मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका २५ मतांच्या गठ्ठ्यामध्ये एकाचवेळी सर्व १८ टेबलांवर विभागल्या जातील. त्यानंतर महिला राखीव मतदारसंघातील मतमोजणी टेबल क्रमांक एक ते नऊवर होईल.

या टेबलावर ५० मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका एकाचवेळी या टेबल क्रमांक एक ते नऊ या टेबलांवर विभागल्या जातील. इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक दहा ते बारावर होईल. मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक एक ते १५ वर होईल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होईल.सर्वसाधारण गटात १६ जागांसाठी ३३ उमेदवार आहेत. त्यात येथे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. त्यामुळे या गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील मतमोजणी गतीने होणार आहे. त्यातही अनूसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय या तीन गटांतील निकाल पहिल्यांदा लागणार आहेत.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर