शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

गोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:01 IST

Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ठरावधारक मृत दिसत आहेत. हरकतीच्या पहिल्याच दिवशी तीन संस्थांनी आपले संस्था प्रतिनिधींचे नाव बदलून ठराव दाखल केले.

ठळक मुद्देगोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृतप्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : पहिल्या दिवशी तीन संस्थांची हरकत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ठरावधारक मृत दिसत आहेत. हरकतीच्या पहिल्याच दिवशी तीन संस्थांनी आपले संस्था प्रतिनिधींचे नाव बदलून ठराव दाखल केले.गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. दुबार ठरावांसह ३६५९ संस्था प्रतिनिधींचा यादीमध्ये समावेश आहे. प्रारूप यादीवर २४ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या यादीत एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव आहेत.वर्षभराच्या कालावधीत सुमारे पन्नास ठरावधारकांचे विविध कारणाने मृत्यू झाल्याचे दिसते. त्यामुळे पहिल्याच दिवशी तीन दूध संस्थांनी हरकत घेत मृत प्रतिनिधींची नावे वगळून दुसऱ्या प्रतिनिधींच्या नावाचा ठराव दाखल केला. यामध्ये अमृतमंथन इंगळी (ता. हातकणंगले), सोमेश्वर, खानापूर (आजरा) या संस्थांचा समावेश आहे.दोन दूध संस्था उच्च न्यायालयातगेल्यावर्षी ठराव दाखल करण्यासाठी दिलेल्या विहीत वेळेत श्रीकृष्ण-काळकुंद्री, विठ्ठल बिरदेव-पट्टणकोडोली, महालक्ष्मी-काळजवडे, छत्रपती शिवाजीराजे-भुयेवाडी व रेणुका-कुर्डू या पाच दूध संस्थांचे ठरावच आले नव्हते. यापैकी छत्रपती शिवाजीराजे व श्रीकृष्ण या संस्थांनी ठराव दाखल करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.बिनविरोध होणाऱ्या संस्थांचे ठराव बदलणारसहकार नियम १० (४) नुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या अगोदर पाच दिवस ठरावधारकांचे नाव बदलता येते. पहिल्या टप्प्यात ८५ दूध संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत संचालक मंडळ बदलले तर ठराव बदलू शकतो. मात्र, दूध संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी व ह्यगोकुळह्णची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पाहता, ज्या संस्था बिनविरोध होतील, त्यांनाच ठराव बदलता येऊ शकतो.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक