शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:21 IST

गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून प्रतिलिटर २० रुपयांप्रमाणे खरेदी केली जाणार आहे.

जिल्ह्यात गाईच्या दुधाचे उत्पादन कमालीचे वाढले असून, त्याची विक्री कशी करायची असा पेच दूध संघापुढे आहे. शासनाने गाईच्या ३.५ फॅटच्या दुधाची प्रतिलिटर २७ रुपयांनी खरेदी करण्याचे आदेश काढले होते; पण गाईच्या दुधाचा उठाव होत नाही आणि पावडरचे दर पडल्याने सर्वच संघांनी दोन रुपयांची कपात केली. पावडरचे दर घसरल्याने दूध संघांना मदत करण्याचे धोरण सरकारने घेतले; पण त्याचा एक रुपयाही फायदा दूध संघांना होताना दिसत नाही. मार्चमधील पावडर उत्पादनापेक्षा ३० टक्के जादा उत्पादन केले तरच प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली; पण कोल्हापूर जिल्ह्यात मार्चनंतर दुधाचे उत्पादन कमी होते; त्यामुळे या काळात मार्चपेक्षा पावडरचे उत्पादन जादा कसे होणार? यामुळे दूध संघांना त्याचा लाभ दिसत नाही.

‘गोकुळ’ रोज १ लाख ६० हजार लिटरची दूध पावडर करते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत प्रतिकिलो १२० ते १२२ रुपये, तर देशांतर्गत बाजारपेठेत १२५ ते १३२ रुपये दर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे संघाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गाईचे दूध जादा आहेच; त्याचबरोबर सीमाभागातून गाईचे दूध वाढले आहे; त्यामुळे म्हशीचे दूध ७० टक्के व गाईचे ३० टक्के खरेदी केले जाते. तोटा वाढू लागल्याने संघाने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.स्थानिक दरकपातीची शक्यतापावडरचे दर असेच राहिले तर स्थानिक गाय दूध खरेदीच्या दरात कपात करावी लागण्याची शक्यता आहे. तशा हालचाली संघाच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते.कर्नाटकात गाईचे  दूध वाढले!आपल्याकडे सप्टेंबरपासून दूध वाढते; पण कर्नाटकात जून महिन्यात दुधाचे उत्पादन वाढते. त्याचा परिणामही संकलनवाढीवर झाला आहे. 

गाईच्या अतिरिक्त दुधामुळे रोज लाखो रुपयांचा तोटा होत असल्याने सीमाभागातील गाईच्या दूधखरेदीत कपात केली.- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर