शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

GokulMilk Kolahpur : सतीश पाटील यांना 'स्वीकृत संचालक'पद द्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:37 IST

GokulMilk Kolahpur : निवडून येण्याची क्षमता असतानादेखील उमेदवारी नाकारल्यानंतरही विरोधी आघाडीच्या विजयासाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांना गोकुळ दूध संघावर 'स्वीकृत संचालक' म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी येथील कार्यकर्त्यांसह गडहिंग्लज विभागातील दूध संस्था पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे.

ठळक मुद्देसतीश पाटील यांना 'स्वीकृत संचालक'पद द्या..!गोकुळ दुध संघ : गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

राम मगदूम

गडहिंग्लज : निवडून येण्याची क्षमता असतानादेखील उमेदवारी नाकारल्यानंतरही विरोधी आघाडीच्या विजयासाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांना गोकुळ दूध संघावर 'स्वीकृत संचालक' म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी येथील कार्यकर्त्यांसह गडहिंग्लज विभागातील दूध संस्था पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे.गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यात मिळून एकूण ११३४ सहकारी दूध संस्था आहेत. त्यापैकी एकूण ८५२ ठरावधारक मतदानासाठी पात्र होते.दररोज हायेस्ट फॅट आणि उत्तम प्रतीचे सुमारे अडीच लाख लिटर दूध गडहिंग्लज विभागातून 'गोकुळ'ला जाते.परंतु, एकूण संस्थांच्या प्रमाणात या विभागाला संचालक मंडळात कधीच प्रतिनिधित्व मिळालेले नाही.नुकत्याच झालेल्या निवडणुकीतदेखील सत्तारूढ आणि विरोधी या दोन्ही आघाड्यांकडून प्रत्येकी ४ प्रमाणे एकूण ८ जणांना उमेदवारी मिळाली.परंतु,महिला राखीव गटातून विरोधी आघाडीकडून लढलेल्या अंजना रेडेकर वगळता उर्वरीत सर्वच उमेदवारांचा 'क्रॉस व्होटिंग'मुळे पराभव झाला आहे.या पार्श्वभूमीवर तीन तालुक्यातील दूध संस्थांना न्याय देण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्याला 'स्वीकृत संचालक' म्हणून संधी देण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेच सतीश पाटील यांचे नाव पुढे आले आहे.गिजवणेचे उपसरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या पाटील यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावरच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पर्यंत मारली.गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य आणि गडहिंग्लज अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक व गडहिंग्लज अर्बन बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.जिल्हयातील प्रमुख संस्था आणि शासकीय यंत्रणेसह तीनही तालुक्यांशीही त्यांचा चांगला संपर्क आहे.पक्षवाढीसाठी मदत होणार..!राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर तिन्ही तालुक्यांशी समन्वय ठेवून पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेसाठी पूर्णवेळ देणाऱ्या सतीश पाटील यांना 'गोकुळ'वर स्वीकृत संचालक म्हणून संधी दिल्यास त्याचा पक्षवाढीसाठीही फायदा होईल,असे जाणकारांचे मत आहे..नेत्यांचा शब्द प्रमाण मानून माघार .!मंत्री मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी म्हणूनच सतीश पाटील यांची ओळख आहे.यावेळी 'गोकुळ'वर जाण्याची संधी नक्कीच मिळणार म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला,वर्षभर जोरदार तयारीही केली.परंतु, आघाडीच्या रचनेत आपल्यामुळे नेत्यांची अडचण होऊ नये म्हणूनच त्यांनी नेत्यांचा शब्द प्रमाण मानून माघार घेतली.तरीदेखील त्यांनी आघाडीच्या विजयासाठी जीवाचे रान केले.त्याची पोचपावती म्हणूनच त्यांना 'स्विकृत' किंवा 'शासकीय प्रतिनिधी' म्हणून 'गोकुळ'मध्ये काम करण्याची संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर