शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोकूळला मुंबईत सिडकोची पाच एकर जागा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:33 IST

Gokul Milk Kolhapur : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टिमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकोकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देगोकूळला मुंबईत सिडकोची पाच एकर जागा मिळणार उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश : टीम गोकूळच्या दौऱ्याला मोठे यश

कोल्हापूर : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टिमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकोकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानंदकडून थकीत पावनेदोन कोटीही देऊ केले. प्रकल्प अनुदानासाठीचा फेरप्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने तातडीने पाठवा, अर्थखाते त्याला मंजुरी देईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.गोकूळ दूध संघात तब्बल तीस वर्षांनंतर घडलेल्या सत्तांतरानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील जम्बो गोकूळ टिमने गुरुवारी मुंबई दौरा केला. यात खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासो चौगले, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, एस. आर.पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे यांनी सहभाग घेतला.उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत गोकूळकडून मुंबईत मार्केटिंगसाठी १० एकर जागेची मागणी करण्यात आली; पण यातील पाच एकर जागा उपलब्ध होईल, असे सांगून पवार यांनी सिडकोचे अधिकारी मुखर्जी यांच्याशी तातडीने फोनवरून संपर्क साधत जागा निश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या. प्रकल्प उभारणीसाठीच्या अनुदानाचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रश्नही शिष्टमंडळाने पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. यावरही त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून फेरप्रस्ताव तयार करून घ्या, पुढील तरतुदीचे मी बघतो, असे सांगून हा देखील विषय निकाली काढला.

टॅग्स :Gokul MilkगोकुळAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर