शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रस्ताव रद्दवर अखेर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:20 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रस्ताव रद्दवर अखेर शिक्कामोर्तबसंचालक मंडळाची बैठक : नोकर भरतीवरही झाली चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.‘गोकुळ’ मल्टिस्टेटच्या ठरावावरून गेले वर्षभर जिल्ह्याचे राजकारण धूमसत आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटले. संघाची मागील सर्वसाधारण सभा या विषयावरून वादळी झाली तरीही संचालक मंडळाने महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची परवानगी घेऊन प्रस्ताव केंद्रीय निबंधकांकडे पाठविला होता; पण ३० आॅक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करून जाब विचारण्याची तयारी विरोधकांनी केली होती.

अखेर सभेच्या अगोदर दोन दिवस अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दूध उत्पादकांची भावना लक्षात घेऊन मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. सर्वसाधारण सभेतही त्यांनी तसे जाहीर केले आणि बुधवारच्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय चर्चेला ठेवला. त्यावर बुधवारी सविस्तर चर्चा होऊन अध्यक्ष आपटे यांनी दिलेल्या पत्रास मान्यता देण्यात आली.संचालक मंडळाची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्त होणाऱ्या जागांचा अंदाज घेऊन गरजेनुसार नोकरभरती करण्याबाबतही चर्चा झाली.माजी अध्यक्षांना आता ‘मल्टिस्टेट’ नकोचदूधवाढ हा जरी मल्टिस्टेट मागचा हेतू सांगितला जात असला तरी संघाची सत्तासूत्रे ताब्यात ठेवण्याचा सत्तारूढ गटाचा उद्देश त्यामागे लपून राहिला नव्हता; पण विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता मल्टिस्टेट नकोच, अशी भूमिका माजी अध्यक्षांनी घेतल्याचे समजते.

मल्टिस्टेटबाबत केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यास बुधवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.- रवींद्र आपटे,अध्यक्ष, ‘गोकुळ’

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर