शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ दूध संघाची गवळ्याचीच भूमिका : उपपदार्थांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:05 IST

एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने

ठळक मुद्देदूधाअगोदर ब्रँड घरात पोहोचवण्याचे आव्हान

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने ‘गोकुळ’च्या ब्रँडलाही मर्यादा आल्या असून परिणामी गायीच्या अतिरिक्त दुधाचे संकट उभे राहिले आहे.

‘गोकुळ’ने प्रत्येक वर्षी दूधवाढीचा संकल्प करून त्यादृष्टीने कृती कार्यक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे संघाने ठरविल्याप्रमाणे दूध वाढत गेले. जातिवंत दुभत्या जनावर खरेदीसाठी संघाने अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले; पण सगळ्यात प्रभावी ठरली ती ‘वासरू संगोपन’ योजना, या योजनेतून लाखो दुभती जनावरे शेतकºयांच्या गोठ्यातच तयारी झाल्याने आपोआपच दूध वाढत गेले.

भाकड काळ कमी, त्यात गायीचे वासराचे चांगले संगोपन झाले तर साधारणत: दीड वर्षांत गाभण जात असल्याने म्हशीच्या तुलनेत योजनेतील गायीचे दूध लवकर सुरू झाले.साधारणत: पाच-सहा वर्षांपासून दूध वाढत गेले, ‘गोकुळ’ने वाढलेल्या दुधाचे ब्रँडिंग केले पण हे करत असताना उपपदार्थ निर्मितीकडे दुर्लक्ष केले. एकूण संकलनापैकी केवळ ५ ते १० टक्केच उपपदार्थ केले जातात. म्हैस दुधाला बाजारात मागणी असल्याने त्याचे ठीक होते, पण वाढणाºया गायीचे दूध कुठे मुरवायचे, याचे नियोजन वेळेत होणे गरजेचे होते. स्वर्गीय वर्गीस कुरियन यांनी ‘दूध घरात नेण्याअगोदर ब्रँड घरात न्या,’ अशी सूचना ‘गोकुळ’ला केली होती. संघाने दुधाचा ब्रँड विकसित केला पण उपपदार्थांकडे दुर्लक्षानेच हा पेच निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

याउलट ‘अमूल’चे रोज दीड कोटी लिटर दूध संकलन आहे. त्यातील ८५ लाख लिटर लिक्वीडमध्ये विक्री होते तर उर्वरित दुधाचे उपपदार्थ केले जातात. गुजरातमध्येही म्हशीबरोबर गायीचे दूध आहे, पण त्यांनी उपपदार्थांचा ब्रँड विकसित केला. गायीच्या दुधापासून टेबल बटर तयार करतात. दिल्लीत महिन्याला ७०० टन टेबल बटरची विक्री होत असल्याने गायीच्या दुधाचा त्यांना प्रश्नच भेडसावत नाही. (पूर्वार्ध)पंधरा वर्षांपूर्वी २० टक्केच गायीचे दूधसाधारणत: १९९० ते २००० या कालावधीत ‘गोकुळ’च्या एकूण संकलनात ८० टक्के म्हशीचे तर २० टक्के गायीचे दूध होते. त्यानंतर हळू-हळू गायीचे दूध वाढत गेले आणि आज हेच प्रमाण ५० : ५० टक्क्यांवर आले आहे.लिक्वीड विक्री फायद्याची  संकलन केलेले दूध प्रक्रिया करून थेट विक्री केली तर त्यातून फायदा अधिक होतो. उपपदार्थ तयार केले तर कष्ट अधिक आणि मार्जिन कमी असल्याने संघाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या उपपदार्थांचा ब्रँड विकसित होऊ शकला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध