शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:46 IST

Gokul Milk Election kolhpaur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया ऑनलाईन पार पडली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २६) होणार असून तोपर्यंत संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निवडणूक कार्यक्रमात २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी आहे.

ठळक मुद्देगोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करासर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश : सोमवारी होणार सुनावणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया ऑनलाईन पार पडली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २६) होणार असून तोपर्यंत संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निवडणूक कार्यक्रमात २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी आहे.गोकुळची निवडणुकीची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट वाढत असल्याने निवडणुकीला स्थगिती द्यावी, यासाठी सत्तारूढ गटाच्या वतीने काही संस्थांनी साधारणता महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.कोल्हापूर जिल्ह्यात रोज पाचशेपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यात दोन दिवसापूर्वी  गोकुळच्या एका ठराव धारकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याने सत्तारूढ गटाने हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयात लावून धरला. ऑनलाईन सुनावणीमध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकल्या, मात्र यातून गोकुळसह अन्य सोळा संस्थांना वगळण्यात आल्याचे ही निदर्शनास आणून दिले.यावर, सोमवारपर्यंत राज्य सरकारने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, निवडणुकीबाबत सोमवारी सुनावणी होणार असल्याने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर