शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election -माझा पराभव झाला नाही, तो केला गेला : वीरेंद्र मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:30 IST

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा पराभव झाला नसून, तो केला गेल्याची सल पराभूत उमेदवार वीरेंद्र संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मंडलिक आहोत, आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं आहे आणि संघर्ष तर आमच्या कुंडलीतच आहे. मी पुन्हा उठून उभा राहीन, लढत राहीन, अशा आशावादही त्यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमाझा पराभव झाला नाही, तो केला गेला : वीरेंद्र मंडलिकसंघर्ष आमच्या कुंडलीतच, पुन्हा लढेन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा पराभव झाला नसून, तो केला गेल्याची सल पराभूत उमेदवार वीरेंद्र संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मंडलिक आहोत, आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं आहे आणि संघर्ष तर आमच्या कुंडलीतच आहे. मी पुन्हा उठून उभा राहीन, लढत राहीन, अशा आशावादही त्यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.मंडलिक विरोधी आघाडीचे उमेदवार होते. एकाच कुटुंबातील दोन उमेदवार रिंगणात होते. त्याशिवाय दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला महालक्ष्मी दूध संघ बंद पडल्याबाबतची नाराजीही वीरेंद्र यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. परंतु त्याशिवायही कागल तालुक्यातून त्यांना वगळून सत्तारूढ गटाला उमेदवारास मतदान झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या पोस्टला महत्त्व आले आहे.वीरेंद्र या पोस्टमध्ये म्हणतात, माझे आजोबा सदाशिवराव मंडलिक व वडाचे झाड यांचं फार जुनं नातं आहे. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे, 'हे वडाचे झाड माझा गुरू आहे. या झाडाने मला बरंच काही शिकवलं. माझ्या सुरुवातीच्या निवडणुकीचे चिन्ह वडाचे झाड आणि माझं आयुष्य सुद्धा या वडाच्या झाडाप्रमाणेच.' वडाच्या झाडाच्या छायेखाली अनेकांना सावली मिळते, तसंच आयुष्य माझ्या आजोबांचं होतं.

दिवंगत मंडलिक यांनाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नाही. माझे वडील संजय मंडलिक यांनाही २००० ते २०१९ पर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांच्याविरुद्ध बोट ठेवायला काही नाही, म्हणून आमचा महालक्ष्मी दूध संघ अडचणीत आणला. स्वतः सात वाजल्यानंतर काही करो, पण माझ्या वडिलांवर खोटेनाटे आरोप झाले तरी आम्ही खचलो नाही आणि मी देखील गोकुळच्या निवडणुकीतील पराभवाने खचणार नाही.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर