शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं

By समीर देशपांडे | Updated: September 1, 2025 12:26 IST

‘गोकुळ’ आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार

समीर देशपांडेकोल्हापूर : घरात बाप्पा बसवल्यानंतर उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, कानोले, कडबू करून बाप्पांना नैवेद्य दाखवून घरच्यांना सणावाराचे खायला घालायचे सोडून शहर आणि परिसरातील अनेक महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. त्यामुळे कोल्हापूरचे ‘थेट’ पाणी ढवळून निघाले आहेत. तर दुसरीकडे एकीकडे ज्या दुधाच्या खव्यापासून बाप्पांसाठी मोदक तयार केले गेले त्याच ‘गोकुळ’च्या दुधाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे.‘गोकुळ’ आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम सुरू आहे. यापुढच्या काळात या दोन्ही संस्थांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचे भांडवल होणार आणि याच भांडवलाच्या जोरावर ‘सत्तासुंदरी’ प्राप्तीसाठी प्रयत्न होणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच ऐन गणेशोत्सवामध्ये रस्त्यावर बोंब मारणे सुरू आहे आणि पत्रकार परिषदांमधून आरोप, प्रत्यारोप होत आहेत.महाविकास आघाडी सत्तेत असताना याच दसरा चौकाच्या मैदानातून ‘थेट पाइपलाइन केली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही’ असे खणखणीत भाषेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. २०१९ नंतरच्या काळात याच शब्दाचा आधार घेत तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही योजना पूर्ण केली आणि दिवाळीच्या आधी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता पुईखडीला जाऊन त्यांनी कर्तव्यपूर्तीची अंघोळही केली; परंतु या गोष्टीला आता पावणेदोन वर्षे झाली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी थेट पाइपलाइनच्या पाणीपुरवठ्यात सतत काही ना काही अडचणी येत गेल्या. आता तर ऐन सणात पाणीपुरवठा बंद पडल्याने नागरिक वैतागले आणि रस्त्यावर उतरले. त्याला महायुतीने आणखी हवा दिली आणि सतेज पाटील यांना ‘लक्ष्य’ करण्याची संधी सोडली नाही.

‘गोकुळ’चं जाजम आणि राष्ट्रवादीचं घड्याळ

  • दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून एकाच जाजमावर येऊन निवडणुकीची तयारी करायची वेळ असताना जाजम खरेदीवरूनच ‘गोकुळ’च्या दुधाला उकळी फुटली आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची मनीषा माजी अध्यक्ष अरुण डोंगळे बाळगून आहेत, त्याच पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या खरेदीवरून सध्या ‘गोकुळ’ची चौकशी सुरू झाली आहे.
  • चार महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणाची कूस बदलणाऱ्या ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीनंतर महायुती प्रबळ होत असताना उद्धवसेनेने याप्रकरणी जोरदार आंदोलन करून चौकशीची मागणी करणे, हे महाविकास आघाडीच्या अजेंड्याला धरूनच आहे; पण भाजपचे अतुल सावे दुग्ध विकास मंत्री असताना या प्रकरणाच्या चौकशीचे तातडीने आदेश देणे, हे अनाकलनीय आहे.