शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ निवडणूक : उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस विरोधकांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 18:55 IST

Gokul Milk Elecation Kolhapur- गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस विरोधकांचाच राहिला. ७ जणांनी १२ अर्ज भरले. त्यातील ११ अर्ज हे विरोधी शाहू आघाडीचे आहेत, तर बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी आघाडीकडून दाखल झाला. पहिल्याच दिवशी तीन विद्यमान आणि एका माजी संचालकाने उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली.

ठळक मुद्देगोकुळ निवडणूक : उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस विरोधकांचाच सत्ताधारी आघाडीतून बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज

कोल्हापूर : गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस विरोधकांचाच राहिला. ७ जणांनी १२ अर्ज भरले. त्यातील ११ अर्ज हे विरोधी शाहू आघाडीचे आहेत, तर बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी आघाडीकडून दाखल झाला. पहिल्याच दिवशी तीन विद्यमान आणि एका माजी संचालकाने उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली.येत्या २ मे रोजी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात गुरुवारपासून झाली. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली खडाखडा पाहता शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी झ्रुंबड उडेल, अशी अटकळ बांधली जात होती, पण गुरुवारी दुपारपर्यंत दोन माजी अध्यक्षांसह विद्यमान संचालकांनीही अर्ज दाखल केल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीचा ज्वर वाढू लागल्याचे स्पष्ट झाले.जिल्हाधिकारी कार्यालयातील करवीर प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी तथा गोकुळ निवडणुकीसाठी नियुक्त झालेले निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीची मुदत होती. प्रतिज्ञापत्र, कागदपत्रासह अर्ज घेऊन तो भरण्यासाठीची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर तैनात केली होती, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वातावरणही बऱ्यापैकी निवडणूकमय दिसत होते.माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आबाजी ऊर्फ विश्वास नारायण पाटील यांनी दोन गटातून चार अर्ज दाखल केले. सर्वसाधारण गट व इतर मागासवर्गीय गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना भगवान लोंढे, निवृत्ती पाटील, युवराज पाटील, युवराज भोगम हे सूचक होते, तर नामदेव पाटील, युवराज पाटील, निवृत्ती पाटील, भगवान लोंढे हे अनुमोदक राहिले. विशेष म्हणजे दरवेळी सत्तारूढकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आबाजी यावेळी पहिल्यांदाच विरोधी आघाडीकडून सर्वप्रथम अर्ज भरणारे ठरले.माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांनीही विरोधी शाहू आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे उमेदवारीवरून नरके घराण्यातील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. चुलते अरुण नरके हे सत्ताधारी आघाडीकडे आहेत, त्यांच्याकडून मुलगा चेतन की स्वत: अरुण नरके हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.गोकुळ संस्थापक घरातील जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर या विद्यमान संचालक आहेत. त्यांचा मुलगा शशिकांत चुयेकर यांनी विरोधी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुयेकरांची दुसरी पिढी गोकुळ रणांगणात सक्रिय झाली. पहिल्याच दिवशी सातजणांनी १२ अर्ज भरले. यात इतर मागासवर्गमधून दोन व सर्वसाधारण गटातून १० अर्जांचा समावेश आहे. इतर मागासवर्गाचे दोन्ही अर्ज विश्वास पाटील यांच्याच नावावर आहेत, तर सर्वसाधारणमधून अरुण डोंगळे, शशिकांत चुयेकर, अजित नरके, बाबासाहेब चौगुले, महाबळेश्वर चौगुले, बाळासाहेब खाडे यांनी अर्ज भरले. दाखल झालेल्या अर्जांपैकी राधानगरी, गडहिंग्लजचा अपवाद सोडला तर उर्वरित १० अर्ज हे एकट्या करवीर तालुक्यातील असल्याने करवीरचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर