शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ नव्या अध्यक्षाची निवड ३० किंवा ३१ मे रोजी, अरुण डोंगळेंचा राजीनामा एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:01 IST

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे ( गोकुळ ) अध्यक्ष ...

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. नवीन अध्यक्ष निवडीसाठी ३० किंवा ३१ मे या दिवशी संचालक मंडळाची सभा बोलविली जाण्याची शक्यता आहे.डोंगळे यांच्या राजीनाम्यामुळे गोकुळच्याराजकारणाचे तापलेले दूध थंड झाले असले तरी आता नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता जिल्ह्यातील दूध उत्पादकांना लागली आहे. सहकार प्राधिकारणाकडे नवीन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.दोन वर्षांची अध्यक्षपदाची टर्म पूर्ण केलेल्या डोंगळे यांनी पुढचा अध्यक्ष महायुतीचाच व्हावा अशी अट घालत राजीनामा देण्यास नकार दिला होता. यामुळे गोकुळच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाले होते. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर मंगळवारी डोंगळे यांनी आपला राजीनामा संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला. गोडबोले यांनी तो मंजुरीसाठी संचालकांच्या बैठकीत ठेवला. या बैठकीत या राजीनाम्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

राजीनामा विभागीय उपनिबंधकांकडे पाठवलाडोंगळे यांचा मंजूर केलेला राजीनामा गोडबोले यांनी पुणे विभागीय उपनिबंधक यांच्याकडे गुरुवारीच पाठवला. उपनिबंधकांकडून तो सहकार प्राधिकरणाकडे पाठवला जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून नव्या अध्यक्ष निवड प्रक्रियेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

अंबरिष घाटगे, नाविद मुश्रीफ गैरहजरगोकुळ संचालकांच्या बैठकीत २१ पैकी २ संचालक गैरहजर होते. अंबरिष घाटगे व नाविद मुश्रीफ हे बाहेरगावी असल्याने या बैठकीला उपस्थित नव्हते. उर्वरित सर्व संचालकांनी बैठकीला उपस्थिती दर्शविली.

डोंगळे यांच्याकडेच प्रभारी कार्यभारनव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत डोंगळे यांच्याकडेच प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यभार राहणार आहे. संघाच्या पोटनियमांमध्येच तशी तरतूद आहे. मात्र, या काळात त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.

नेत्यांनी दोन वर्षाची अध्यक्षपदाची संधी दिली, त्या संधीची मी सोने केले याचा अभिमान आहे. गोकुळच्या इतिहासात सर्वाधिक नफा माझ्या काळात मिळवून देता आला. हे यश माझ्या एकट्यामुळे नसून सर्वांच्या साथीमुळे मिळवता आले. -अरुण डोंगळे, संचालक, गोकुळ दूध संघ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारण