दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने ‘गोकुळ’ संचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:28+5:302021-06-01T04:17:28+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे संघाच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विश्वास ...

Gokul Director felicitated on behalf of Dudh Sanstha Employees Union | दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने ‘गोकुळ’ संचालकांचा सत्कार

दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने ‘गोकुळ’ संचालकांचा सत्कार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे संघाच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अध्यक्ष पाटील म्हणाले, संघाशी संलग्‍न प्राथमिक दूध संस्‍थांमध्‍ये काम करणारे संस्था कर्मचारी यांचा कोरोना महामारीच्‍या काळातील दूध संकलनामध्‍ये मोलाचा वाटा आहे. संघ नेहमीच दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. दूध संस्‍था कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी संघटनेचे सचिव विश्वास पाटील, खजानीस सुरेश जाधव, सदस्य दत्तात्रय बोळावे, आबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय बोळावे, के. डी. पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, आदी उपस्थित होते. (फोटो-३१०५२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Gokul Director felicitated on behalf of Dudh Sanstha Employees Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.