शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

gokukl Result : अंजना रेडेकर यांचा विजय नजरेत भरणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:00 IST

GokulMilk Result Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना केदारी रेडेकर यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक या विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडत असताना रेडेकर यांचा विजय मात्र नजरेत भरणारा ठरला.

ठळक मुद्देअंजना रेडेकर यांचा विजय नजरेत भरणारामतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना केदारी रेडेकर यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक या विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडत असताना रेडेकर यांचा विजय मात्र नजरेत भरणारा ठरला.रेडेकर यांचे माहेर गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे. त्यांचे सासर आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी. त्यांचे पती केदारी रेडेकर हे शिवसेनेचे हार्डकोअर कार्यकर्ते होते. मुंबईचे ते नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर अंजना रेडेकर राजकारणात आल्या. त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात १९९५ ला सत्तेत असताना त्यांना गडहिंग्लजला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्याशिवाय आता त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळाही सुुरु केली आहे. गेल्या निवडणूकीत सर्वसाधारण गटातून लढून त्यांनी १२४६ मते मिळवली होती. गोकूळची निवडणूक ठरावधारकांच्या हातात असते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून सगळ्या जोडण्या लावल्याने व त्यांना आघाडीतूनही पालकमंत्री सतेज पाटील यांचे मोठे पाठबळ मिळाल्याने विजयाचा गुलाल मिळाला. गोकुळ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या पाच वर्षे सक्रीय होत्या.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर