शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

कोल्हापूर: आदमापुरात बकरी भुजविणे व लेंढीपूजनाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात, नेमकी प्रथा काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 14:43 IST

रात्री शाहीर सत्यवान गावडे यांनी धनगरी ओवीगायन केले तर धनगर समाजबांधवांनी ढोल-कैताळांच्या तालावर धनगरी गीते गाऊन रात्र जागवली.

बाजीराव जठारवाघापूर : भंडाऱ्याच्या उधळणीत व ढोल कैताळाच्या गजरात श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील मरगुबाई मंदिराशेजारी असलेल्या बाळूमामांच्या बक-यांच्या तळावर मोठ्या भक्तीमय वातावरणात लेंढीपूजन व बकरी भुजविण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. बाळूमामांनी दीपावली पाडव्याच्या दिवशी आपल्या मेंढ्यांची पूजा करण्याची प्रथा सुरु केली होती ती प्रथा भाविकभक्तांनी आजही जोपासली आहे.रात्री शाहीर सत्यवान गावडे यांनी धनगरी ओवीगायन केले तर धनगर समाजबांधवांनी ढोल-कैताळांच्या तालावर धनगरी गीते गाऊन रात्र जागवली. सकाळी बाळूमामांच्या बक-यांच्या लेंढ्यांची रास करुन राशीला ऊस, कर्दळ, केळी उभी करुन विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी सजवून या राशीची प्रथम बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मनोभावे पूजा केली. लेंढ्यांच्या राशीजवळच एका मातीच्या मडक्यात शेळ्या-मेंढ्यांचे दूध संकलित करुन ते विस्तवावर ठेवले जाते. दुध कुणीकडे व कोणत्या दिशेला ऊतू जाते हे पाहण्यासाठी भाविकभक्तांनी एकच गर्दी केली होती.दूध ऊतू गेल्यानंतर लगेचच धनगराचे धन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळपातीलच काही बक-यांचे पूजन करुन त्यांना हार-तुऱ्यानी सजवून त्यांच्या पाठीमागे ढोल-कैताळ वाजवून, फटाक्यांची आतषबाजी व भंडा-याची मुक्तहस्ते उधळण करुन त्यांना पळविणेत आले. असा 'बकरी बुजवणे 'कार्यक्रम साजरा केला गेला. यावेळी हजारो भाविकभक्तांनी 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात केला. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.या उत्सवाप्रसंगी सदगुरु बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, बग्गा नंबर पाचचे कारभारी लक्कापा दुरदुंडे, सर्व मेंढके, सचिव रावसाहेब  कोणकेरी, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, विठ्ठल पुजारी, सर्व सेवक, भक्त व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर