शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:06 IST

कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

ठळक मुद्देबकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठीमुस्लिम बोर्डिंगसह शहरातील मस्जिदींमध्ये नमाज पठण

कोल्हापूर : कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.बकरी ईदनिमित्त सोमवारी सकाळी मुस्लिम बोर्डिंग परिसरात मौलाना मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी महाराष्ट्रावरचे पुराचे संकट दूर होऊ दे, अशी दुआ केली. यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी खिरीचे वाटप केले व पूरग्रस्तांसोबत खीर खाऊन बकरी ईद साजरी केली.

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, रफिक मुल्ला, फारुख पटवेगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी जिल्ह्यातील नेतेमंडळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र यंदा अवघे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी झटत असल्याने नेत्यांनीही येणे टाळत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.  शहरातील विविध मस्जिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले.बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची पद्धत आहे. मात्र हीच रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात अनेक मुस्लिम बांधवांनी गहू, तांदूळ, साखर, चहापूड, तेल, साबण असे जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांना दिले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर