शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचेच ध्येय - मिताली गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:43 IST

संतोष मिठारी । कोल्हापूर : विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात तिरंदाजीचा सराव

संतोष मिठारी ।कोल्हापूर : विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मिताली श्रीकांत गायकवाड हिने सांगितले.

शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीच्या (आर्चरी) सरावासाठी आलेल्या मिताली गायकवाड हिने ‘लोकमत’शी संवाद साधला. जकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या पॅरा एशियन गेम्स्मध्ये तिने सेकंड रँक पटकाविली. त्यासह विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये यश मिळविल्याने आत्मविश्वासात भर पडली असल्याचे मितालीने सांगितले. नेदरलँडमध्ये जून २०१९ मध्ये पॅराआर्चरीची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टॉप-टेन रँकिंगसाठीची स्पर्धा होणार आहे. त्यातील रँकिंगसाठीच्या स्पर्धेत देशभरातील ४० खेळाडूंचा समावेश आहे. त्यातून अव्वल १0 खेळाडूंची निवड होणार आहे.

या स्पर्धेतील यश हे टोकिओ (जपान) येथे सन २०२० मध्ये होणाऱ्या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागासाठी महत्त्वाचे आहे; त्यामुळे जकार्तामधील स्पर्धा झाल्यापासून नेदरलँडमधील स्पर्धेसाठीची तयारी सुरू केली. रोज सकाळी सात ते साडेअकरा आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सराव करते. व्हीलचेअरवरून स्पर्धा खेळणारी मी एकमेव खेळाडू आहे. प्रशिक्षक रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव सुरू आहे. शिवाजी विद्यापीठात रविवार (दि. ६) पासून तीन दिवस सराव केला. विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. पी. टी. गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मिताली हिने सांगितले.आता पुण्यामध्ये सरावसरावातील एक वेगळेपण म्हणून राज्यातील विविध शहरांतील मैदानांवर जाऊन तयारी करीत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत बालेवाडी (पुणे), डेरवण (रत्नागिरी) आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सराव केला आहे. त्यातून एक वेगळा अनुभव आला. आता जूनपर्यंत पुणे येथेच सराव करणार असल्याचे मितालीने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ