शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: दीड कोटीची गोवामेड दारू जप्त, पन्हाळा रोडवर सापळा रचून पकडला ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:37 IST

दोघांना अटक, विभागीय भरारी पथकाची कारवाई

कोल्हापूर : आंबा घाटमार्गे एक कोटी ४७ लाख ८४ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू घेऊन आलेला ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पन्हाळा रोडवरील पडवळवाडीजवळ पकडला. सोमवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास सापळा रचून केलेल्या कारवाईत दारू आणि ट्रक असा एक कोटी ७७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारे शैलेश जयवंत जाधव (वय ३६, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि वासुदेव केशवराज मुंढे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांना पथकाने अटक केली.विभागीय कार्यालयाचे निरीक्षक किरण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा घाटमार्गे एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार भरारी पथकाने सोमवारी रात्री पन्हाळा रोडवर पडवळवाडीजवळ सापळा रचला.

संशयित ट्रक (एमएच. १२, व्हीटी. ७४०३) अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १४०० बॉक्स आढळले. एक कोटी ४७ लाख ८४ हजारांचा दारूसाठा जप्त करून ट्रकचालक शैलेश जाधव आणि त्याचा सहकारी वासुदेव मुंढे याला पथकाने अटक केली. या दोघांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.निरीक्षक पवार यांच्यासह दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सहायक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पोवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली.

आंबा घाट ते जतपर्यंत जबाबदारीअटकेतील जाधव आणि मुंढे यांच्याकडे दारूची वाहतूक करणारा ट्रक आंबा घाट ते कोल्हापूर, सांगली मार्गे जत येथे पोहोच करण्याची जबाबदारी होती. तिथून पुढे राज्याबाहेर पाठवण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तींकडे होती, अशी माहिती अटकेतील दोघांनी पथकाला दिली. हे दोघेही वाहन चालक म्हणून काम करतात.व्हिस्कीच्या तब्बल ६७ हजार २०० बाटल्याभरारी पथकाने पकडलेल्या ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या १८० मिलीच्या तब्बल ६७ हजार २०० बाटल्या सापडल्या. गेल्या वर्षभरातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. यावरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.