शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंधारलेल्या डोळ्यांना ‘स्नेहज्योती’कडून आशेचा किरण

By admin | Updated: July 24, 2014 22:31 IST

अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचे रोपटे

शिवाजी गोरे -दापोलीमरावे परी कीर्तीरुपी उरावे, या उक्तीप्रमाणे मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंधांच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम करत आहे. सुनीता कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी घराडी येथे २००३ मध्ये अंध विद्यालय सुरु करुन अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचे रोपटे लावले. या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यामागे संस्था व दानशूर व्यक्तींनी डोळसपणे केलेले कार्यसुद्धा प्रेरणादायी ठरले आहे.मंडणगड तालुक्यातील दुर्लक्षित ग्रामीण भागातील घराडी येथे अंध मुलांसाठी शाळा काढण्याचा निर्णय या दोन बहिणीनी घेतला. त्यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे आले. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा समाजकार्यासाठी उपयोग व्हावा, या हेतूने पुण्यातील नोकरी सोडून प्रतिभा सेनगुप्ता घराडी येथे आल्या. तसेच मुंबईत सुशिक्षित घराण्यातील सुनीता शशिकांत कामत यांनी गावचा ध्यास घेतला. आई - वडिलांच्या वडिलोपार्जित शेतीचा समाजाच्या कल्याणासाठी वापर व्हावा, या उदात्त हेतूने जिल्ह्यातील पहिली अंध शाळा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याकाळी अंधांसाठीसुद्धा वेगळी शाळा असते. ही संकल्पना इतरांना व खासकरुन अंधांना माहीत नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पालक अंधशाळेत पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे ३ मुलांपासून ही शाळा सुरु झाली. स्वप्नील पड्याळ, निकिता बर्जे, दीपिका बर्जे या तीन विद्यार्थ्यांपासून शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज या शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी येथे शिक्षण घेण्यासाठी येणारी सर्व मुले गरीब घरातील असल्यामुळे या मुलांच्या वसतिगृहापासून, शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी संस्थेने स्वीकारली. अंध मुलांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी या संस्थेने अहोरात्र मेहनत घेतली. अंध मुलेही इतरांप्रमाणे डोसळपणे जगायला हवीत, म्हणून त्यांना शिक्षणाबरोबरच कार्यानुभव, संगीत, वाद्य, गायन, स्वयंरोजगाराचे शिक्षण दिले जाते. स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी अंध मुलांच्या जीवनात ज्योतीने ज्योत पेटवून समाजात त्यांना डोळसपणे जगण्याचा हक्क निर्माण करुन देत आहे.सुरुवातीच्या काळात संस्थेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुलांना शाधून आणण्यापासून, त्यांना शाळेत शिक्षण देण्यापर्यंत लागणारा संपूर्ण आर्थिक खर्च संस्थेला उचलावा लागत होता. त्यानंतर संस्थेने समाजात केलेल्या जनजागृतीच्या जोरावर हळूहळू विद्यार्थी येऊ लागले. परंतु शिक्षक मिळेनासे झाले. त्यामुळे शिक्षकांना शोधून आणावे लागले. त्यांना मानधन, मुलांचा खर्च, शिपाई, पहारेकरी, स्वयंपाकी सर्वांचा खर्च संस्थेला पेलवेनासा झाला. त्यामुळे कामत व सेनगुप्ता या बहिणींना पदरमोड करावी लागली. कित्येकवेळा त्यांनी मोठ्या धाडसाने मुलांच्या हितासाठी कटू निर्णय घेतले. एखादा विद्यार्थी आजारी असल्यास स्वत: गाडीत बसवून रात्री - अपरात्री दवाखान्यात घेऊन जातात. शाळेतील अंध मुलांना पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळतात. संस्थेवर जातीनिशी लक्ष देऊन या रोपट्याचे वृक्षात रुपांतर केले.स्नेहज्योती अंध विद्यालय अंध मुलांच्या जीवनात ज्योतीने ज्योत पेटवण्याचे महान कार्य करत आहे. सुरुवातीच्या काळात कष्ट घेतल्यामुळे शाळेला चांगले दिवस आले. आज या शाळेला सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्नाने भेट देऊन या मुलांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला. संस्थेला आज देणगीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. कधीकाळी याच संस्थेला मुलांचे रेशनिंगसुद्धा उधार किंवा उसने आणावे लागत होते. परंतु चांगले काम केले की, समाजात देणारे हजारो हात पुढे येतात एवढे मात्र नक्की आहे, हे स्नेहज्योती या संस्थेने समाजाला दाखवून दिले. स्नेहज्योती अंध विद्यालयात अनेकांचे मदतरुपी स्नेह आहे. या संस्थेला अनेक दानशूर व्यक्तिंनी हातभार लावल्याने स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. संस्थेने काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टीही मिळवून दिली आहे. या संस्थेचे कार्य निश्चितच समाजभूषणाचे आहे.