शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या कलचाचणी प्रमाणपत्रांचे उद्यापासून वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:39 IST

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरुवारी सहकार विषयाच्या पेपरला कॉपी करताना भरारी पथकाने तीन परीक्षार्थींना पकडले.

ठळक मुद्देदहावीच्या कलचाचणी प्रमाणपत्रांचे उद्यापासून वाटपबारावी परीक्षेत तीन कॉपीबहाद्दर सापडले; टी. एल. मोळे यांची माहिती

कोल्हापूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरुवारी सहकार विषयाच्या पेपरला कॉपी करताना भरारी पथकाने तीन परीक्षार्थींना पकडले.या कल-अभिक्षमता चाचणी अहवालाचे वाटप शिक्षण मंडळाकडून शाळांना त्यांच्या जिल्हा संकलन अथवा वितरण केंद्रावर आज, शुक्रवारी होईल. उद्या, शनिवार ते शुक्रवार (दि. २२) दरम्यान शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या दिवशी संबंधित परीक्षा केंद्रांवर शाळा प्रतिनिधीला पाठवून विद्यार्थ्यांची तक्ता अथवा यादीवर स्वाक्षरी घेऊन अहवाल प्रमाणपत्रांचे वाटप करावयाचे आहे. वाटपाचे काम पेपर संपल्यानंतरच केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी दिली.दरम्यान, बारावीच्या परीक्षेत गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत सहकार विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान कुुरुंदवाड येथील एस. के. पाटील महाविद्यालयाच्या केंद्रावर तीन परीक्षार्थींना भरारी पथकाने कॉपी करताना पकडले. त्यांच्यावर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेचा अखेरचा पेपर बुधवारी (दि. २०), तर दहावीचा शेवटचा पेपर शुक्रवारी (दि. २२) होणार असल्याचे मोळे यांनी सांगितले. 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८kolhapurकोल्हापूर