शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर खंडपीठाबाबत थोडासा वेळ द्या, निश्चितच योग्य तो निर्णय होईल; मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:30 IST

कोल्हापूर : आम्ही नुकतेच रुजू झालो आहोत. आपण ३५ वर्षे केलेल्या आंदोलनाच्या लढ्याची माहिती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ...

कोल्हापूर : आम्ही नुकतेच रुजू झालो आहोत. आपण ३५ वर्षे केलेल्या आंदोलनाच्या लढ्याची माहिती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच होण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. थोडासा वेळ द्या, निश्चितच सर्व कायदेशीर बाजू पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक ५५ मध्ये त्यांची भेट घेतली.मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. चंदूरकर, एम. एस. सोनक, रेवती मोहिते-ढेरे पाटील, रविंद्र व्ही. घुगे यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने भेट घेतली.बैठकीत खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत, ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध आहे. त्यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायमूर्ती यांच्या समोर माहितीचे सादरीकरण केले. कोल्हापुरातून मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटले, कोल्हापूरचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व, अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. कोल्हापूरपासून सहा जिल्ह्याचे अंतर आणि सर्किट बेंच स्थापन झाल्यास या जिल्ह्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले.

सुरुवातीला मुख्य न्यायमूर्ती आराधे यांनी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ भेटीसाठी यावे, असे सांगितले. त्यात निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई, वसंतराव भोसले आणि विवेक घाटगे यांचा समावेश होता. त्यानंतर समितीने विनंती केल्यानुसार सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील, सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी निशिकांत पाटोळे, रत्नागिरी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष निनाद शिंदे, सांगलीचे श्रीकांत जाधव, कराडचे संभाजी मोहिते सहभागी झाले.

अंबाबाईची मूर्ती, कोल्हापुरी फेटा देऊन सत्कार

दरम्यान शिष्टमंडळासोबत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव राजू ओतारी, लेखापरीक्षक कर्णकुमार पाटील, माजी अध्यक्ष ॲड. रणजीत गावडे, शिवाजीराव राणे ,राजेंद्र चव्हाण, प्रशांत शिंदे, अजित मोहिते, राजेंद्र मंडलिक, पिराजी भावके, सुनील गावडे, विजय महाजन, आर. आर. तोष्णीवाल, अमित सिंग आदी उपस्थित होते. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा श्री अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ आणि कोल्हापुरी फेटा देऊन निमंत्रक खोत यांनी सत्कार केला. प्रशासकीय न्यायमूर्ती यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान या विषयावरील पुस्तक भेट दिले. तसेच, मान्यवरांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण समितीने दिले. त्यांनी ही विनंती मान्य केल्याचे खोत यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय