कोल्हापूर : जिल्ह्यातील पुरामुळे कृषी वगळता झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्यांची यादी संबंधित तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास सोमवारपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी केले आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पुरामुळे जिल्ह्यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. शेती वगळता घरांची पडझड, गोठ्याची पडझड, हस्तकला, दुकानदार, टपरीधारक अशा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या याद्या तलाठी कार्यालयात प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत कोणाची हरकत असल्यास ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी व तहसील कार्यालयामध्ये हरकतीचा अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
----