शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी मुदतवाढ द्या, कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:25 IST

भूसंपादनासाठीची २० सप्टेंबरपर्यंतची वाढीव मुदतही संपल्याने जागामालकांना जागेचा मोबदला कमी मिळणार असल्याकडे खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळ भूसंपादनासाठी मुदतवाढ द्या, विमानतळ प्राधिकरणाला तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी शुक्रवारी विमानतळ कृती समितीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, नायब तहसीलदार संजय मधाळे, तलाठी संतोष भिऊंगडे तसेच विमानतळ कृती समितीचे विलास सोनुले, अरुण सोनवणे, अनिल सोनुले यांच्यासह जमीन मालक उपस्थित होते.काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या ६४ एकर जमिनीपैकी एकतीस एकर जमिनीचे संपादन झाले आहे. संंबंधित खातेदारांना जमिनी ताब्यात देण्याबाबत महसूल विभागाने नोटीस दिल्या आहेत. भूसंपादनासाठीची २० सप्टेंबरपर्यंतची वाढीव मुदतही संपल्याने जागामालकांना जागेचा मोबदला कमी मिळणार असल्याकडे खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे भूसंपादनासाठी मिळालेली वाढीव मुदतही संपल्याने उर्वरित जमीनमालकांना अपेक्षित रक्कम मिळणार नाही. तसेच २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. यावर कृती समितीने भूसंपादनासाठीच्या मुदतवाढीसाठी विमानतळ प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाला पाठवू अशी ग्वाही दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळcollectorजिल्हाधिकारी