शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भूतबाधा, करणीच्या नावाखाली महिलेस आठ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:10 IST

आईचे भूत बाहेर काढतो, मुलीचे लग्न जमवितो, नवीन गाडीचा विधी, घरातून भूतबाधा, करणी दूर करण्यासाठी दोन भोंदू कुटुंबियाने आठ लाख रुपये घेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित मनीषा विद्याधर नाईक, तिचा पती विद्याधर आण्णासाहेब नाईक, भक्ती विद्याधर नाईक (सर्व रा. जिवबा नाना जाधव पार्क) आणि सुनीता सतीश कारंडे (रा. आर. के. नगर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देभूतबाधा, करणीच्या नावाखाली महिलेस आठ लाखांचा गंडाकुटुंबासह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा

कोल्हापूर : आईचे भूत बाहेर काढतो, मुलीचे लग्न जमवितो, नवीन गाडीचा विधी, घरातून भूतबाधा, करणी दूर करण्यासाठी दोन भोंदू कुटुंबियाने आठ लाख रुपये घेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संशयित मनीषा विद्याधर नाईक, तिचा पती विद्याधर आण्णासाहेब नाईक, भक्ती विद्याधर नाईक (सर्व रा. जिवबा नाना जाधव पार्क) आणि सुनीता सतीश कारंडे (रा. आर. के. नगर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.करवीर पोलिसांनी सांगितले की, संशयित चौघांनी फियार्दी ज्योती सूर्यकांत चन्नी (वय ५० रा. डी वॉर्ड, गंगावेश ) यांना आईचे भूत काढतो, मुलीचे लग्न जमवून देतो, नवीन गाडीचा विधी करत असल्याची कामे करीत असल्याचे सांगितले. त्यासह घरातील भूतबाधा आणि करणी दूर करण्यासाठी वेळोवेळी पैशाची मागणी केली.

विधी होम हवनसह नियोजित दत्त मंदिर जागेसाठी, महाप्रसादासाठी मार्च २०१४ पासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधी आठ लाख रुपये घेतले. ही सर्व रक्कम स्वखुशीने देणगी म्हणून देत असल्याचे करारपत्रावर लिहून घेतले. मात्र ही सर्व धार्मिक विधीचे आमिष दाखवून केवळ पैसे उकळल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच ही रक्कम परत मागण्यासाठी फियार्दी त्यांच्या घरी गेल्या असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार मनीषा विद्याधर नाईक यांच्या जिवबा नाना जाधव पार्क येथील घरी मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला. नाईक आणि कारंडे कुटुंबियांनी अनेकांना भूतबाधा, करणीची भिती घालून पैसे उकळल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर