शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

घानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हा, विठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:04 IST

घानवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन तिघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.

ठळक मुद्देघानवडेत मारामारी, पाच जणांवर गुन्हाविठ्ठलाई दूध संस्थेचा वाद

कोल्हापूर : घानवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन तिघांनी केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, दूध संस्थेतील गणेश ठेव वाटपाच्या कारणावरुन सभासदांच्यात वाद झाला. या वादातून लोखंडी गज आणि प्लॉस्टिक खुर्ची डोक्यात घातल्याने सतीश पाडुंरग शिंदे, गणेश बापू शिंदे, बबन दत्तू शिंदे (सर्व रा. चव्हाणवाडी, घानवडे) हे जखमी झाले.

या प्रकरणी संशयित शामराव कृष्णा गावडे, प्रकाश भिवाजी गावडे, कृष्णात शामराव गावडे (सर्व रा. चव्हाणवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तुकाराम ज्ञानू सावंत यांनी दिलेल्या फियार्दीनुसार सतीश पांडुरंग शिंदे, सूरज शिंदे (दोघेही रा. चव्हाणवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

संशयित दोघांनी लोखंडी गजाने मारहाण केल्याने तुकाराम सावंत आणि सदाशिव गोपाळ शिंदे जखमी झाल्याचे फियार्दीत म्हटले आहे. याप्रकरणी सतीश शिंदे आणि तुकाराम सावंत यांनी फिर्यादी दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर