शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ घंटानाद-बोंब मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:57 IST

लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद-बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देअण्णा हजारेंच्या समर्थनार्थ घंटानाद-बोंब मारो आंदोलनभ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनतर्फे सरकारचा निषेध

कोल्हापूर : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद-बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे अण्णांची तब्येत ढासळत असून, त्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सरकारची भूमिका ढिम्म व निद्राधीन असल्याने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह सरकारला जाग येण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद-बोंब मारो आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्यासह सरकार विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शंखध्वनी केला.जिल्हा संयोजक नारायण पोवार म्हणाले, एकेकाळी लोकपालबाबत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. परंतु आज याबाबत अनास्था दिसत आहे. भाजपसह हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा असणारा हिरीरीने सहभाग आता दिसत नाही. त्यांच्यासह जनतेने या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची वेळ आली आहे. आंदोलनात उत्तम पाटील, नीलेश रेडेकर, आनंदा गुरव, डॉ. सुरेश पाटील, राजू माने, अभिजित भोसले, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर