शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएडची ६०, तर एमपीएडची ७५ हजारांत डिग्री मिळवा : शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:20 IST

बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेसबुकद्वारे केले आहे.

ठळक मुद्देबीपीएडची ६०, तर एमपीएडची ७५ हजारांत डिग्री मिळवा : शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेखनांदेडचा असल्याचे सांगणाऱ्या युवकाचे फेसबुकद्वारे आवाहन

कोल्हापूर : बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेसबुकद्वारे केले आहे.

त्याबाबत सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशात शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संदेशातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास मी देत असल्याची डिग्री बनावट असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे.फेसबुकवरील हा संदेश गेल्या काही दिवसांपासून अन्य सोशल मीडियावरून प्रसारितझाला आहे. त्यामध्ये सन २०११ पासूनच्या कालावधीतील बीपीएड, एम.पी.एड. डिग्री उपलब्ध आहेत. त्या देण्याचे काम ६० दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित युवकाने केले आहे.

हा संदेश मिळाल्यानंतर कोल्हापुरातील काही प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, त्यावेळी त्याने माझ्या काही मित्रांची अडचण होती. त्यामुळे त्यांना मी अशी डुप्लिकेट डिग्री दिली आहे. तुम्हाला कशासाठी हवी आहे? तुम्हांला इंटरेस्ट असेल, तर कळवा, असे त्याने सांगितले आहे.

सोशल मीडियावरील या संदेशामध्ये शिवाजी विद्यापीठाचा थेटपणे त्याने उल्लेख केला आहे. हा संदेश सर्व स्पोर्टस ग्रुप, कोचेस आणि स्पोर्टसमनपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्याने केले आहे. त्याच्या या संदेशाने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्याबाबतच्या कारवाईचे पाऊल तातडीने उचलण्याची मागणी प्राध्यापक, अधिकाऱ्यांकडून होत आहे.

शिवाजी विद्यापीठाचे नाव वापरून डिग्रीबाबत कोणी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत असेल, तर त्याला विद्यार्थ्यांंनी बळी पडू नये. सावधगिरी बाळगावी. संबंधित युवकाने विद्यापीठाच्या नावाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत कुलसचिवांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.-डॉ. आर. व्ही. गुरव, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ

दिल्लीपर्यंत कनेक्शनया संदेशाची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गुरव यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी स्वत:ची ओळख न सांगता त्याच्या संदेशाच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यामध्ये त्या युवकाने देशातील कोणत्याही विद्यापीठाची बी.पी.एड., एम.पी.एड., नेट-सेट, पीएच.डी.ची डिग्री देऊ शकतो. त्याबाबत दिल्लीत कनेक्शन असून तेथील लोकांद्वारे काम होईल, असे त्याने सांगितल्याची माहिती डॉ. गुरव यांनी दिली.अत्यंत गंभीर बाबया प्रकरणात उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रशासनास पत्र दिल्याचे समजले. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित बाब शिवाजी विद्यापीठाच्या पदवीशी निगडित आहे. तसेच ती अत्यंत गंभीर असल्याने आपण या संदेशाच्या प्रतीसह ही माहिती कुलसचिवांच्या निदर्शनास बुधवारी आणल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर