शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या मुलाचे दातृत्व, प्रज्ञाच्या शिक्षणाची स्विकारली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:10 IST

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थीनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्यामुळे प्रज्ञाला प्रज्ञावंत होण्यासाठी स्वाभिमानीमुळे पाठबळ मिळाले.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या मुलाचेही दातृत्वप्रज्ञाच्या शिक्षणाची स्विकारली जबाबदारी

शिरोळ : शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले जाते. मात्र, याला छेद देत प्रत्यक्ष मदतीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पुढे आली आहे.

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थीनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्यामुळे प्रज्ञाला प्रज्ञावंत होण्यासाठी स्वाभिमानीमुळे पाठबळ मिळाले.पोर्ले तर्फे ठाणे येथील प्रज्ञा घाटगे या विद्यार्थीनीने दहावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली. ना वडिलांचा ना आजोबांचा आधार, दोघांचेही निधन झाल्यामुळे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे आई, आजीच्या रोजगारावर घरखर्च करीत चार बहिण भावंडांसोबत प्रज्ञाचा शैक्षणिक खर्च पेलणे शक्य नाही, ही माहिती समजल्यानंतर प्रज्ञाची शिक्षणाची जिद्द आणि तळमळ पाहून सौरभ शेट्टी यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमार्फत तिच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. प्रज्ञाची भेट घेवून सौरभ यांनी तिचा सन्मान केला.

यावेळी प्रज्ञाने सौरभ यांना राखी देखील बांधली व त्यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावाप्रमाणे उचलायचा शब्द दिला. शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी आघाडीने घेतल्यानंतर प्रज्ञाचे कुटुंबियही भारावले. यावेळी राम चेचर, विक्रम पाटील, तेजस कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांच्यासह स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकमतच्या वृत्ताने प्रज्ञाला आधारप्रज्ञाच्या उच्च शिक्षणासाठी गरीबीचा अडथळा, वडील-आजोबांच्या निधनामुळे घरची परिस्थिती बनली बिकट या मथळ्याखाली ह्यलोकमतह्णने वृत्त प्रसिध्द केले होते. ह्यलोकमतह्णमध्ये आलेली ही बातमी वाचल्यानंतर सौरभ शेट्टी यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर परिषदेच्यावतीने प्रज्ञाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून एक नवा अध्याय सुरु केला आहे. 

 शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद काम करीत आहे. मेडीकलला प्रवेश घेवून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रज्ञाच्या सर्व शिक्षणाचा खर्च स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सगळे भाऊ करणार आहेत.- सौरभ राजू शेट्टी

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर