शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक मार्चपर्यंत पूर्ण होणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

By विश्वास पाटील | Updated: October 13, 2023 16:55 IST

'असा' तयार होणार पुतळा

कोल्हापूर, : महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापशी (ता. कागल) येथील स्मारक मार्चअखेर पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सरसेनापती संताजी घोरपडे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान योद्ध्याचे स्मारक पिढ्यान- पिढ्या प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.मंत्री मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने  सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. स्मारकामधील पुतळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या कामावर आतापर्यंत साडेचार कोटी रुपये खर्च झाला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकासह परिसरातील सभागृह, ग्रंथालय, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह चबुतरा या विषयांवर चर्चा झाली.'असा' तयार होणार पुतळाडॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान यांनेही संताजीच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती. महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे एकही मूळ छायाचित्र किंवा त्यावर आधारित पुतळा उपलब्ध नाही. त्यामुळे; त्यांचा संपूर्ण इतिहास वाचून त्यांच्या चरित्रावरूनच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि एकूणच पुतळा निर्माण होणार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार  किशोर पुरेकर हा पुतळा घडविणार आहेत.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, वास्तु विशारद अमरजा निंबाळकर, कागलचे उप अभियंता सी. ए. पाटील, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ