शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Ganpati Festival -गौराई आली माहेराला... घरोघरी गौरीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:16 IST

सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देगौराई आली माहेरालाघरोघरी गौरीची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.गणपती बाप्पांचे आगमन झाले की पाठोपाठ आई गौराईदेखील माहेरपणाला म्हणून भक्तांच्या घरी येते. दोन दिवस राहून पती शंकरोबासोबत पुन्हा आपल्या कैलासावर परततात. या परिवारदैवतांच्या पूजेअर्चेने घराघरांतील वातावरण मांगल्याने भारून जाते.

यंदा गणपती बाप्पांच्या नंतर तीन दिवसांनी गौराईचे आगमन झाले. दारात छान रांगोळी सजली. गणपतीशेजारी देवीसाठीही आरास सजली. याप्रसंगी घराघरांतील सुवासिनी महिला व कुमारिका पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन तेथे कळशीत गौराईचे डहाळे पूजतात. तेथे गौराईच्या गीतांवर फेर धरून गौरीगीते गात या पारंपरिक सणाचा आनंद लुटला जातो.यंदा सगळीकडे कोरोनाचे संकट असले तरी महिलांनी सणाच्या उत्साहात कुठेही कमतरता ठेवली नाही. आपल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत महिलांनी पंचगंगा नदीघाट, रंकाळा अशा जलाशयांच्या ठिकाणी गर्दी केली होती. नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा नखरा, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीच्या डहाळ्यांचे पूजन केले.पूजनानंतर घरात पाऊल ठेवताना गौरी आली, काय काय लेवून आली, काय घेऊन आली... अशा प्रश्नांना उत्तर देत तिच्या आगमनाने सुख-समृद्धी आल्याचे सांगत गणपतीशेजारी गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रानावनांत वाढलेल्या गौराईला मिश्र भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य दाखवण्यात आला.गौरीच्या खेळांची हौसयंदा सर्वत्र कोरोना असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र गौरी-गणपतीत महिलांनी गौरीगीतांवर खेळ नाही खेळले तर सणाचा आनंद पूर्ण होत नाही. त्यात मंगळवारी पावसाचे उघडीप दिली. त्यामुळे रात्री महिलांनी मास्क घालून गौरीगीतांचे खेळ खेळले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर