शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उंदरवाडीत कालव्यात पडला गवा; सुदैवाने पाण्याबाहेर पडल्याने वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:32 IST

यापुर्वीही या ठिकाणी अनेकवेळा गव्यांचा कळप पाण्यात पडल्याच्या आणि गवा मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या

रमेश वारके बोरवडे: काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात गवा पडल्याची घटना कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या हद्दीत घडली. सध्या या कालव्याला पाणी असल्याने हा गवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होता. परंतु सुदैवाने बेलजाई मंदिराजवळील लोखंडी पुला जवळून या गव्याला  पाण्याबाहेर पडण्यासाठी जागा मिळाल्याने तो बाहेर पडून डोंगराकडे निघून गेला.याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, उंदरवाडी गावच्या हद्दीत सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात पडलेला गवा दिसला. सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा गवा वाहत जात होता. ज्ञानदेव फासके, एन.के. जाधव, संभाजी पाटील, विठ्ठल पाटील आदी  नागरिकांनी या गव्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला काठावरुन हुसकावण्याचा प्रयत्न केला. गव्याने पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतू कालव्याचे अस्तरीकरण केल्याने गव्याचे पाय निसटत होते. हा गवा पोहत अस्तरीकरण न केलेल्या ठिकाणाहून पाण्याबाहेर पडून डोंगर भागाकडे निघून गेला. यापुर्वीही या ठिकाणी अनेकवेळा गव्यांचा कळप पाण्यात पडल्याच्या आणि गवा मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथे गव्यांसाठी रँम्पची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर