शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशी ८० रुग्ण बाधित ; यमगेतील गस्ट्रो ची साथ अजूनही आटोक्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:03 IST

मुरगूड - { कोल्हापूर} : - कागल तालुक्यातील यमगे गावामध्ये पसरलेली गस्ट्रो ची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही.विद्यानगर या ...

ठळक मुद्दे सर्व गावात पसरली साथ पाण्याचा अहवाल पिण्यास अयोग्य

मुरगूड - {कोल्हापूर} : - कागल तालुक्यातील यमगे गावामध्ये पसरलेली गस्ट्रो ची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही.विद्यानगर या परिसरात असणारी साथ आता संपूर्ण गावात पसरली असून चौथ्या दिवशी ८० रुग्ण बाधित झाले आहेत.विद्यानगर येथील टॉकी मधील आणि गावातील सर्व बोअरवेल तसेच मुख्य विहिरी मधील पाण्याचा अहवाल पिण्यास अयोग्य आला असून आता संपूर्ण गावात साथ पसरत असल्याने गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.           यमगे विद्यानगर येथून मंगळवारी सुरू झाली गस्ट्रोची साथ आता संपूर्ण गावात पसरली आहे.चार दिवस झाले तरी साथीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.ज्या ठिकाणाहून सुरू झाली तेथील उपचार झालेल्या रुग्णांना पुन्हा पुन्हा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार करावे लागत आहे.साधारणता तीन दिवसांमध्ये या साथीवर नियंत्रण मिळवता येते पण चौथ्या दिवशी ही मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने अजून ही प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे.काही नागरिक मात्र होणाऱ्या उपचारावर समाधान व्यक्त करत नाहीत.तर काही जण थेट खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करत आहेत.                   दरम्यान विद्यानगर येथील जुन्या टॉकी मधील,तसेच गावाला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुख्य विहिरी मधील तसेच गावातील सर्व बोअर वेल मधील पाण्याचे नमुने घेतले होते कोल्हापूर येथे ते तपासणी साठी पाठवले होते.त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.पण आता संपूर्ण गावात ही साथ पसरल्याने गावाला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सर पिराजीराव तलावातील पाण्याकडे संशयाचे बोट दाखवले जात आहे.पण याच तलावातील पाणी मुरगूड आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी दिले जाते पण ते फिल्टर होऊन जाते.त्यामुळे प्रशासनाने आता तलावातील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठवले आहेत.त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.      पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.आज जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे,शिवानी भोसले यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण