शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चावरेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्त: दीड लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:42 IST

चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

ठळक मुद्देचावरेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्तदीड लाखांचे नुकसान

नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ; चावरे येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांचे भाऊबंदासह कौलारू घर आहे.घरी पत्नी, मुलगा सागर, सून व नातवंडासह ते राहतात.आज मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घरातील सिलेंडर संपले म्हणून दुसरे सिलेंडर जोडले.गॅस प्रवाह सुरू केला असता निपल मधून जोरात गॅस गळती सुरू झाली. सागर पोपट घोडके यांनी प्रसंगावधान राखून घरातील सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर घरात तात्काळ आग भडकली. घरातील फ्रिज, टीव्ही, मिक्सर, तिजोरी अंथरूण - पांघरूण व भांडी जळून खाक झाली. या घटनेत दीड लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज सागर घोडके यांनी व्यक्त केला आहे. सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की घराच्या चारही खोल्यांचे छत उध्वस्त झाले. सर्व भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नंदकुमार आनंद घोडके व शंकर आनंदा घोडके यांच्या स्वयंपाक घराचे छताची पडझड होऊन त्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत.या घटनेची फिर्याद सागर पोपट घोडके यांनी वडगाव पोलिसात दिली आहे. गॅसच्या निपल मधून गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती पोपट घोडके यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे घोडके कुटुंबीय हाताश झाले आहेत.जीवित हानीचा अनर्थ टळलानवीन सिलेंडर गॅस शेगडीला जोडत असताना निपल मधून वेगाने गॅस गळती सुरू झाली. प्रसंगावधान लक्षात घेऊन सागर घोडके यांनी घरातील सर्वांना घराबाहेर काढले. कुटुंबीय घराबाहेर पडताच सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आग भडकली. सागर यांच्या प्रसंगावधाना मुळे जीवितहानी चा अनर्थ टळला. 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर